सहा दिवसांपासून गोवा धुमोसतोय; एअर फोर्स, नेव्ही मैदानात

Pramod Yadav

गोव्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय नौसेना आणि नौदल मैदानात उतरले आहे.

Fire In Goa

गोव्यातील मागील सहा दिवसांपासून इतिहासातील सर्वात मोठी सुरू आहे. यामुळे राज्यातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Fire In Goa

म्हादई अभयारण्यात शनिवारपासून आग धुमसत असून साट्रे, देरोडे, अनमोड घाट, शिगाव-काले, पोट्रे-नेत्रावळी, कारेमळ-काले, धारबांदोडा याठिकाणी आग सुरूच आहे.

Fire In Goa

भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या वतीने हजारो लिटर पाणी ओतून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

Fire In Goa

आगीमुळे म्हादई अभयारण्याची अपरिमित हानी झाली असून सुमारे 400 पेक्षा जास्त हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.

Fire In Goa

राज्यभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 797 जवान तैनात केले आहेत, अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली.

Fire In Goa

जवळपास 50 कर्मचारी मोलेजवळील दुर्गम भागात तैनात केले आहेत.

Fire In Goa

गुरुवारी राज्यभर 28 आगीच्या दुर्घटना नोंदवल्या. यात झारीवाडा, साखळी, बर्नुदे-कुंकळ्ळी, बोरी तसेच दूधसागर, नगर्से, काणकोण यांचा समावेश आहे.

Fire In Goa

राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आग परिस्थितीची हवाई पाहणी केली. जाणूनबुजून कोणी आग लावताना आढळ्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे गोवा सरकारने म्हटले आहे.

Fire In Goa