Yashasvi Jaiswal ने पाडला विक्रमांचा पाऊस

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धेत 11 मे रोजी राजस्थान रॉयल्सने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

जयस्वालची विक्रमी खेळी

या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने 13 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे त्याने अनेक विक्रम केले.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

सर्वात जलद अर्धशतक

जयस्वाल आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. त्याने केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांना मागे टाकले. या दोघांनी आयपीएलमध्ये खेळताना प्रत्येकी 14 चेंडूत अर्धशतक केले होते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

टी20तील जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा युवराज सिंगनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. युवराजने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये 12 चेंडूत अर्धशतक केले होते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावा

आयपीएल 2023 हंगामात यशस्वी जयस्वाल पॉवरप्लेमध्ये (1-6 षटके) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने पॉवरप्लेमध्ये 62 धावा केल्या होत्या.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

पहिल्या दोन चेंडूवर षटकार

जयस्वाल टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या दोन चेंडूंवरच दोन षटकार मारणारा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

सर्वाधिक सामनावीर

जयस्वाल आयपीएल 2023 मध्ये चारवेळी सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या हंगामात त्याच्यापाठोपाठ ५६ सामन्यांपर्यंत रविंद्र जडेजाने तीनदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

500 पेक्षा अधिक धावा

जयस्वाल आयपीएलच्या एका हंगामात 500 पेक्षा अधिक धावा करणारा चौथा अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेला) ठरला आहे.त्याच्या आत्तापर्यंत 575 धावा झाल्या आहेत. यापूर्वी शॉन मार्श (616 धावा, 2008), ईशान किशन (516 धावा, 2020), सूर्यकुमार यादव (512 धावा, 2018) यांनी असा कारनामा केला आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak
Mumbai Indians | Dainik Gomantak