Yuvraj Singh ने दोन नाही, तर जिंकलेत 'हे' तीन वर्ल्डकप

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

त्याच्या नावावर वरिष्ठ स्तरावर तब्बल 7 आयसीसी स्पर्धांंच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा विश्वविक्रम आहे.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

त्याने 2000, 2002 आणि 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे, 2007 आणि 2014 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपचे, तसेच 2003 आणि 2011 वर्ल्डकपचे अंतिम सामने खेळले आहेत.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

तो 2007 टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. याच स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रमही केला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

युवराज 2011 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा प्रमुख सदस्य होता. त्याने या स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

याशिवाय युवराजने 2000 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्येही भारतीय संघाकडून खेळला होता. हा वर्ल्डकपही भारताने जिंकला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

त्यामुळे युवराजने 19 वर्षांखालील, टी20 आणि वनडे वर्ल्डकप विजेता खेळाडू आहे.

Yuvraj Singh | Dainik Gomantak
Dainik Gomantak