'अंनिस'तर्फे विद्यार्थ्यांचे सापांविषयी प्रबोधन

अमित गवळे
शुक्रवार, 13 जुलै 2018

पाली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली शाखेतर्फे रोहा तालुक्यातील चणेरा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती देण्यात आली. श्रीकॉम्प क्रिएशन्स ट्रस्टच्या वतीन अायोजित हा कार्यक्रम सोमवारी (ता.९) चणेरा येथील डॉ. चंद्रकांत कोठारी हॉस्पिटल इमारतीमध्ये झाला. यावेळी विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले गेले.

अंनिस शाखा पालीचे प्रधान सचिव अमित निंबाळक यांनी यावेळी विवीध सापांविषयी माहिती देवून त्यांच्या बद्दल असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज दूर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध माहिती दिली. 

यावेळी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर चणेरा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच प्रसन्ना सिनकर, श्रीकाॅम क्रीएशन ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष तुकाराम लाड, सचिव गुरव, खजिनदार राजाराम लाड, चनेरा कुणबी समाज अध्यक्ष बाळाराम भोईर, डॉ .चंद्रकांत कोठारी,धोंडखार ग्रामपंचायत सदस्य शंकरजी दिवकर, टेमघर खांबेरे पोलीस पाटील अभिजित भोईर, सुडकोळी जि प शाळेचे शिक्षक सुरेश भोईर,चनेरा ई सेवा केंद्र प्रमुख अतुल पाटील , न्हावे ग्रामपंचायत माजी सरपंच भाय तांडेल, अशोक सानप व चनेरा परिसरातील महाविद्यालयीन विदयार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या