ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत अनिरुद्ध भट विजेता

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

28 एप्रिल रोजी मडगावी घेतलेल्या या स्पर्धेत एकुण 38 खेळाडुंनी भाग घेतला.

 

फातोर्डा

अनिरुद्ध भटने सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनने आयोजित केलेल्या पहिल्या 3एमसीसी अखिल गोवा ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याला 1250 रुपयाचे रोख बक्षिस देण्यात आले. ही स्पर्धा 3 मस्केटिअर्स चेस क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. 28 एप्रिल रोजी मडगावी घेतलेल्या या स्पर्धेत एकुण 38 खेळाडुंनी भाग घेतला. चेस डॉट कॉम वर आयोजित या स्पर्धेचे परिक्षण आशेश केणी, संजय कवळेकर व आशा शिरोडकर यांनी केले.

अनिरुद्धचे प्रथम मानांकित रितविज परब व मंदार लाड सोबतचे डाव अनिर्णित राहिले तर त्याने बाकिच्या डावामध्ये विजय प्राप्त केले. रितविज परबला सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रोख 1000 रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले. पार्थ साळवीला तिसरे स्थान मिळाले. त्याचे 6.5 गुण झाले. त्याला 750 रुपये देण्यात आले. 

इतर विजेते - गौरव मडकईकर(चौथा), मंदार लाड (पाचवा), विवान बाळ्ळीकर (सहावा), रुबेन कुलासो (सातवा), शेन ब्रागांझा (आठवा), सागर शेट्टी (नववा) व साईराज वेर्णेकर (दहावा). या स्पर्धेसाठी एकुण 5000 रुपयांची बक्षिसे प्रायोजित करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या