गोवा काँग्रेस च्या उमेदवारांचे अर्ज

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

उत्तर गोवा काँग्रेसकडे इच्छुकांचे ४५ अर्ज

जिल्हा पंचायत निवडणूक

म्हापसा : आगामी जिल्हा पंचायत निवडणुका जिंकण्याची कुवत काँग्रेस पक्षामध्ये असल्याचे काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर गोव्यातील विविध मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून आपण इच्छुक असल्याचे काँग्रेसकडे पंचेचाळीस अर्ज आल्याचेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात माहिती देताना भिके म्हणाले, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक म्हापसा येथील पक्ष कार्यालयात झाली. प्रत्येक मतदारसंघात किमान दोन तीन अर्ज आले. एकही अर्ज नसलेला कोणताही मतदारसंघ राहिलेला नाही. त्या बैठकीत सर्व अर्जांची छाननी करून उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. ती यादी पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.

काँग्रेस पक्षाला जनतेचे पाठबळ असून, कोणत्या पक्षाच्या हाती जिल्हा पंचायतींची सूत्रे द्यावी, हे जनताच ठरवणार आहे. जिल्हा पंचायतीच्या राखीव जागांबाबत भाजप ससरकारने चुकीचे धोरण अवलंबल्याचा आरोप भिके यांनी केला. भाजपला निवडणुकीत पराभव होण्याची भीती असल्यानेच त्यांनी अशाप्रकारे गोंधळ घातला असावा, असेही ते म्हणाले.

अबब : राज्‍यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस

संभाव्य उमेदवारांची नावे सुचवण्यासंदर्भात संबंधित मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी साहाय्य केले असून त्यामध्ये सर्वच प्रबळ उमेदवारांचा समावेश आहे. यासंदर्भात पक्षकार्यकर्त्यांच्या भावनेची कदर करण्यात आल्याचेही त्यांनी सागितले.

संबंधित बातम्या