नारळाची करवंटी वाढवतेय इंग्लडची शान

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी: गोव्‍यातील नारळ जगप्रसिध्‍द आहे. येथे नारळाच्‍या झाडाचा कोणताही भाग फेकून न देता त्‍यापासून विविध वस्‍तू तयार करण्‍यावर भर दिला जातो. नारळाच्‍या करवंटीपासून आगळेवेगळे सजावटीचे झाड कलाकार सुबोध केरकर यांनी तयार केले आहे. त्‍यांनी तयार केलेले हे झाड सध्‍या इंग्‍लडमधील हिमालयीन गार्डन अँड स्‍कल्‍पर पार्क, द हट्‍स येथे बर्फाने आच्छादलेले असून या कलाकृतीला येथील लोक दाद देत आहे.

हि कलाकृती तयार करण्‍यासाठी हजारो नारळांच्या करवंट्या कंटेनरमधून इंग्लंडला नेण्यात आल्या. हि कलाकृती एका बाजूला नारळाच्या करवंट्यांनी व्यापलेली आहे, तर दुसरीकडे यॉर्क शायरच्या जंगलातून पाइन-शंकूही यावर सुशोभित करण्‍यात आले आहेत. या कलाकृतीमागे टाकाऊ पासून टिकावू ही संकल्‍पना आहे. ही कलाकृती या उद्यानातील लोकप्रिय शिल्पांपैकी एक आहे आणि मागील वर्षभरात हजारो लोकांनी त्याला भेट दिली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे या कलाकृती बर्फाने आच्छादल्यामुळे त्याचे अनोखे रुपडे पर्यटकांना पाहायला मिळाले. 

संबंधित बातम्या