भारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात उभारी घेणार असल्याचे शुभ संकेत आयएमएफने दिले आहेत.

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात उभारी घेणार असल्याचे शुभ संकेत आयएमएफने दिले आहेत. भारताचा विकासदर हा विक्रमी 11.5 टक्के राहणार असल्याचे भाकित वर्तवले. या आयएमएफच्या अंदाजामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. चीन आणि इतर विकासदर जास्त असणाऱ्या देशांच्या विकासदरापेक्षा भारताचा विकासदर यंदाच्या वर्षात जास्त असणार आहे. आयएमएफने सध्या प्रकाशीत केलेल्या अहवालात मागील बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येला तोंड देणाऱ्या मोदी सरकारला दिलासा मिळणार असल्याचे अर्थिक जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

लॉकडाउनमध्ये भारतात गरिबी वाढली - 

आयएमएफने जारी केलेल्या जागतिक आर्थिक विकासाचा आढावा घेणाऱ्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधार होत असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. मागील वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठ्याप्रमाणात घसरण झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात चीनचा विकासदर हा 8.1 टक्के राहणार आहे. त्याचबरोबर फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचा दर हा 5.5 टक्के राहणार आसल्याचा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.

भारत हा वेगाने आर्थिक विकास करत आसणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारताच्या यंदाच्या वर्षात जास्त विकासदर गाठणार असल्याच्या पाठीमागे कोरोना लस अप्रत्यक्षपणे कारणीभूत असल्याचे आयएमएफने आपल्या अहवालात निरिक्षण नोंदवले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचा आमचा अंदाज आहे असे आयएमएफने म्हटले. 2020 शेवटच्या काही महिन्यांमध्ये अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशांच्या आर्थिक विकासदरामध्ये वाढ झाली होती. आता इतर देशांमध्ये सुध्दा कोरोनामुळे आलेली मरगळ दूर दूर करुन अर्थव्यवस्था  विकासदराच्या दिशेने वाटचाल करतील असे भाकित वर्तवले जात आहे. त्यातही भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात दोन आकडी विकासदर गाठणार असल्याचे आएमएफच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.      

      

संबंधित बातम्या