Sun Pharma च्या हलोल प्लांटला यूएस एफडीएकडून 10 आक्षेप; शेअर्समध्ये मोठी घसरण

सन फार्माच्या शेअर्समध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
Sun Pharmaceutical Industries Ltd.
Sun Pharmaceutical Industries Ltd.Dainik Gomantak

सन फार्माच्या शेअर्समध्ये 10 मे रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. कंपनीच्या हलोल येथील प्लांटला US FDA कडून 10 आक्षेप मिळाले आहेत. कंपनीकडून या आक्षेपांना उत्तरे देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. कंपनी या 15 दिवसात यूएस एफडीएला आपला प्रतिसाद सादर करणार आहे. (10 objections from US FDA to Sun Pharma Halol plant Big drop in shares)

Sun Pharmaceutical Industries Ltd.
एसबीआयने ग्राहकांना दिली भेट, आता ठेवींवर मिळणार मोठा नफा

लक्षात घेण्यासारखे आहे की दुपारी साडोबाराच्या सुमारास सन फार्माचा शेअर NSE वर 20.40 रुपयांनी आणि 2.64 टक्क्यांनी घसरून 862.45 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. स्टॉकने 29 एप्रिल 2022 रोजी 966.90 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि 18 जून 2021 रोजी 652.75 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांकी दर गाठला. सध्या हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 11.27 टक्क्यांनी खाली दिसत आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 31.44 टक्क्यांनी वर दिसून येत आहे.

NSE वर आज शेअर रु. 885.00 वर उघडला, तर कालच्या व्यवहारात शेअर रु. 885.40 वर बंद झाला आहे. या समभागाचा आजचा दिवसाचा निम्नांक रु.846.50 आहे तर दिवसाचा उच्चांक रु.890.85 एवढा आहे. समभागाचे प्रमाण 4,195,157 च्या आसपास दिसून येत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 206,906 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीचा हलोल प्लांट गुजरातमध्ये स्थित आहे. US FDA ने 26 एप्रिल ते 9 मे 2022 दरम्यान प्लांटची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (GMP) तपासणी केली आहे आणि ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर US FDA ने कंपनीला 10 आक्षेपांसह फॉर्म-483 जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com