भारतीय बाजाराची चांदी, एका महिन्यात देशात 26,517 कोटींचा FDI

1 ते 30 सप्टेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटीमध्ये 13,154 कोटी आणि कर्ज किंवा बॉण्ड मार्केटमध्ये 13,363 कोटी रुपये गुंतवले आहेत (FDI)
भारतीय बाजाराची चांदी, एका महिन्यात देशात 26,517 कोटींचा FDI
26,517 cr rupees FDI in Indian market in September month Dainik Gomantak

सप्टेंबर मध्ये शेअर बाजाराने (Share Market) 2.73 टक्के वाढ नोंदवली आहे.या महिन्यात सेन्सेक्सने (Sensex) देखील 59 हजार आणि 60 हजारांचा टप्पा ओलांडला होता . बाजाराच्या या तेजीत परदेशी गुंतवणूकदारांचे मोठे योगदान आहे (FDI). परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात (Indian Market) 26,517 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे . सलग दुसरा महिना आहे की भारतीय बाजारात FDI मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळत आहे. (26,517 cr rupees FDI in Indian market in September month)

डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटीमध्ये 13,154 कोटी आणि कर्ज किंवा बॉण्ड मार्केटमध्ये 13,363 कोटी रुपये गुंतवले आहेत. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 26,517 कोटी रुपये झाली. यापूर्वी एप्रिलमध्ये एफपीआयने भारतीय बाजारात 16,459 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मासिक आधारावर, बाजार मे महिन्यापासून तेजीत आहे. मे ते सप्टेंबर पर्यंत सलग पाच महिने बाजारात तेजी राहिली आहे. साप्ताहिक आधारावर सातत्याने होणारी अपट्रेंड या आठवड्यात थांबली. या आठवड्यात सेन्सेक्सने 0.42 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.

26,517 cr rupees FDI in Indian market in September month
LIC IPO ची वाट पाहणाऱ्यांठी मोठी बातमी, वाचा डिटेल्स

सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात बाजार भांडवलामध्ये 1,80,534.34 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे . टॉप 10 कंपन्यांच्या यादीत फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल वाढले आहे . गेल्या आठवड्यात बीएसईच्या 30 समभागांचा सेन्सेक्स 1,282.89 अंकांनी घसरला आहे .

Related Stories

No stories found.