28 वर्षाचा शांतनु रतन टाटांना देतो बिजनेस टिप्स

Shantanu Naidu
Shantanu Naidu

वयाच्या 28 व्या वर्षी शांतनु नायडू(Shantanu Naidu) नावाच्या तरूणाने व्यवसाय उद्योगात(Business) स्थान मिळवले आहे, लोकांचं जे स्वप्न पंन्नासाव्या वर्षापर्यंत पूर्ण होत नाही ते त्याने 28 व्या वर्षी पूर्ण केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की शांतनु नवीन स्टार्टअपच्या गुंतवणूकीसाठी रतन टाटा(Ratan Tata) यांना टिप्स(Business Tips) देतो. शांतनुची एक कंपनी(Company) आहे जीच नाव मोटोपॉज आहे जी कुत्र्यांसाठी  रिफलेक्टर कॉलर(Reflector collar) बनवते. शांतनु नायडू आपल्या इंस्टाग्राम अकांउंट वरून  'ऑन योर स्पार्क्स' सोबत थेट लाइव्ह येतो. तिथेच त्याची मोटोपॉज कंपनी आहे, जी कुत्र्यांच्या कॉलचे डिझाइन तयार करते. जे अंधारात चमकतात ज्यामुळे कुत्र्यांच्या जिवाला धोका होत नाही. शांतनु नायडू चा हा व्यवसाय सर्वत्र पसरला आहे.

असे म्हटले जाते की शांतनुच्या आधी, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी रतन टाटासाठी काम केले होते, म्हणून वडिलांच्या सांगण्यावरून, शांतनुने टाटा यांना पत्र लिहिले, त्याला उत्तर म्हणून रतन टाटा यांनी त्याला भेटण्याचे आमंत्रण दिले. या भेटीदरम्यान टाटा यांनी स्ट्रीट डॉग्स प्रोजेक्टसाठी शांतनुला मदत मागितली पण शांतनुने नकार दिला, नंतर रतन टाटा यांनी मोठी गुंतवणूक केली आणि त्यानंतर मोटोपॉज कंपनी देशातील बर्‍याच शहरांमध्ये पोहोचली. 

वेबिनारसाठी प्रति व्यक्ती 500 रुपये घेतो

नायडू प्रत्येक रविवारी 'ऑन योर स्पार्क्स' सह त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर लाइव्ह येतो. त्याने आतापर्यंतच्या सात सत्रात सहभाग घेतला आहे. नायडू 'ऑन स्पार्क्स' वेबिनारसाठी प्रति व्यक्ती 500 रुपये घेतो. त्याची कंपनी मोटोपॉज, जी कुत्र्यांच्या कॉलरचे डिझाइन बनवते. त्याचा हा मोटोपॉज व्यवसाय 20 हून अधिक शहरात आणि चार देशात पोहचला आहे.

शांतनुला रतन टाटाबरोबर काम करण्याची संधी मिळाली
शांतनुने कॉर्नेलमध्ये प्रवेश घेतला, तेथून शांतनुने एमबीए केले, कोर्स संपल्यानंतर, त्यांला रतन टाटांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सन 2019 मध्ये टाटा कडून त्यांच्या ऑफिसमध्ये येण्याचे आमंत्रण आले, शांतनु म्हणते की टाटांसोबत काम करणे हे त्याचे भाग्यच आहे अशी संधी आयुष्यात एकदाच येते.

शांतनुने आपल्या कामाद्वारे रतन टाटा यांचे मन जिंकले
महान उद्योजक रतन टाटा हेही शांतनुच्या चांगल्या कल्पनांचे चाहते आहेत. असे म्हटले जाते की, शंतनु नायडू रतन टाटा यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणूकीच्या स्टार्टअप्सचा मेंदू आहे, म्हणजे शांतानूने आपल्या कार्याद्वारे रतन टाटा यांचे मन जिंकले आहे. रतन टाटांचा देशाच्या स्टार्टअप सिस्टमवर खोल विश्वास आहे, असे म्हटले जाते की ज्या स्टार्टअपला रतन टाटाचा पाठिंबा मिळतो, त्यांची नेहमी वृद्धीच होत जाते. आणि त्या व्यवसायात लक्षणीय वाढ होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com