"5G डेटा प्लॅनची ​​किंमत 4G पेक्षा जास्त असावी": Vodafone-Idea

Vodafone-Idea Limited ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.
5G Network
5G NetworkDainik Gomantak

कर्जामध्ये बुडलेली Vodafone-Idea Limited (ViL) ला विश्वास आहे की 4G सेवांच्या तुलनेत 5G डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क भरावे लागणार आहे. VIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर यांनी गुंतवणूकदारांशी केलेल्या कॉलमध्ये सांगितले की, कंपनीने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. (5G data plans should cost more than 4G Vodafone Idea)

त्यामुळे 5G सेवांच्या डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क ठेवले जाऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवांचे शुल्क वाढवले ​​जाणार, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पुढे टक्कर म्हणाले की, "5G लिलावात खूप पैसे गुंतवले गेले आहेत. आमचा विश्वास आहे की 5G सेवांचे शुल्क 4G पेक्षा जास्त ठेवले पाहिजे तसेच तुम्ही त्याला प्रीमियम सारखे म्हणू शकता.

मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) रिलायन्स जिओ, सुनील भारती मित्तलची भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 5जी स्पेक्ट्रम मिळविण्याच्या शर्यतीमध्ये होती.

दरम्यान, किमान 4.3 लाख कोटी रुपयांच्या एकूण 72 गीगाहर्ट्झ रेडिओ लहरी बोली अंतर्गत ठेवण्यात आल्या होत्या. तसेच हा लिलाव विविध निम्न (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1,800 MHz, 2,100 MHz, 2,300 MHz), मध्यम (3,300 MHz) आणि उच्च (26 बँड GHz) फ्रिक्वेंसीमध्ये स्पेक्ट्रमसाठी आयोजित करण्यात आला होता.

2015 मध्ये स्पेक्ट्रम लिलावातून 1.09 लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला

5G सेवेच्या आगमनाने, इंटरनेटचा वेग 4G पेक्षा सुमारे 10 पट जास्त असणार आहे. यामध्ये इंटरनेटचा स्पीड एवढा असेल की काही सेकंदात मोबाईलवर चित्रपट डाउनलोड करता येईल, यासह ई-हेल्थ, मेटाव्हर्स, अत्याधुनिक मोबाइल क्लाउड गेमिंगसह विविध क्षेत्रात 5G क्रांती घडवून आणेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com