5G Spectrum Auctioning: 7 दिवसांच्या लिलावात सरकारने केली दीड लाख कोटींची कमाई

एकदा टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G मोबाइल सेवा सुरू होईल.
5G Network
5G NetworkDainik Gomantak

5G Spectrum Auctioning: 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रिया आज पुर्णपणे संपली. या लिलाव प्रक्रियेत चार दूरसंचार कंपन्यांनी 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे, जी सरकारच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 रोजी सुरू झाला, जो 7 दिवस चालला.

5G Network
डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या स्टेप्स

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्स, जे पहिल्यांदाच 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात टेलिकॉम क्षेत्राच्या माध्यमातून प्रवेश करत आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने वेगवेगळ्या बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी आक्रमकपणे बोली लावली असल्याचे मानले जाते. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लिलावात ठेवलेल्या सर्व बँडसाठी चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या लिलावात या बँडसाठी कोणीही खरेदीदार नव्हता. मात्र 5G स्पेक्ट्रम लिलावात 1,50,173 कोटी रुपयांची बोली सरकारच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. तसेच, 2015 मध्ये लिलावातून मिळालेल्या 1.09 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसुलापेक्षा हे अधिक आहे.

5G Network
LPG Price Reduced: LPG च्या दरात कपात,जाणून घ्या कितीने झाले स्वस्त

इंटरनेटचा वेग 5G पेक्षा 10 पट जास्त

असे मानले जात आहे की, एकदा टेलिकॉम कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G मोबाइल सेवा सुरू होईल. मात्र, 5G मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर मोबाइल टेलिफोनी आणि इंटरनेटचे जग बदलून जाईल. एका अंदाजानुसार, 5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवे पर्व सुरू होईल. ज्या गोष्टी आतापर्यंत मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, त्या खेड्यापाड्यांपर्यंत उपलब्ध होतील, ज्यामध्ये ई-औषध, शिक्षण आणि कृषी क्षेत्राचा समावेश आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर देशातील डिजिटल क्रांतीला नवा आयाम मिळणार आहे. रोबोटिक्स तंत्रज्ञान विकसित होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच ई-गव्हर्नन्सचा विस्तार होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com