ITR Filing: आयकर रिटर्न भरण्याचे 7 फायदे, मुदतीपूर्वी करा आयटीआर फाइल

सरकारने ITRची मुदत वाढवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
ITR Filin
ITR FilinDainik Gomantak

ITR Filing: आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2022-23 (AY23) साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. आयकर विभाग लोकांना सतत सांगत आहे की आयटीआर फाइलिंग (Income Tax Return Filing) डेडलाइनची वाट पाहू नका आणि उशीर न करता लगेच तुमचा आयटीआर फाइल करा. सध्या, ITR दाखल करण्याची अंतिम (ITR Filing Deadline) मुदत 31 जुलै 2022 आहे. मात्र ही मुदत वाढवली जाईल याची शाश्वती नाही. सरकारने मुदत वाढवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

वेळ केल्यास होणार गैरसोय

जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर वेळ न घालवता हे काम पूर्ण करा. आयटीआर दाखल करणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरते आणि ते दाखल न करणे काही प्रसंगी त्रासदायक ठरू शकते. आजच्या काळात अशी अनेक महत्त्वाची आर्थिक कामे आहेत ज्यात आयकर विवरणपत्राची मागणी केली जाते. जर तुम्ही वेळेवर सातत्याने ITR भरला असेल, तर तुम्हाला त्यांचा फायदा मिळतो, तर ITR दाखल न केल्याने तोटा होतो. कधी कधी काही कामं त्याशिवाय अपूर्ण राहतात.

ITR Filin
ITR Rule: टॅक्स भरताना तुम्ही 'ही' माहिती लपवू शकणार नाही

ही कागदपत्रे आजच काढून ठेवा

आयटीआर भरण्यासाठी, तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, गुंतवणूक तपशील आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26AS आवश्यक असेल. यावेळी आयकर विभागाने एआयएसशी डेटा जुळणे अनिवार्य केले आहे.

तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तरीही तुम्ही आयकर रिटर्न भरत नसाल, तर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तुम्हाला इतर समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 31 जुलैपर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

ITR Filin
Nirav Modiवर EDची कारवाई, हाँगकाँगमधील 252 कोटींची मालमत्ता जप्त
  • इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याचे 7 फायदे

  1. विकसित देशांच्या व्हिसासाठी ITR आवश्यक आहे.

  2. आयटीआर हा सर्वात स्वीकार्य उत्पन्नाचा पुरावा आहे.

  3. आयटीआर भरून तुम्ही कर परतावा मिळवू शकता.

  4. बँकेचे कर्ज मिळणे सोपे आहे.

  5. व्यवसाय सुरू करण्यासाठी ITR आवश्यक आहे.

  6. तुम्हाला अधिक विमा संरक्षण हवे असेल तरीही ITR आवश्यक आहे.

  7. आयटीआर अॅड्रेस प्रूफमध्येही उपयुक्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com