7th Pay Commission: जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 5 टक्कांची वाढ

1 जुलै रोजी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
7th Pay Commission
7th Pay Commission Dainik Gomantak

केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आनंदाची समोर येत आहे... तुम्हीही DA वाढण्याची वाट पाहत असाल, तर ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. 1 जुलै रोजी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. (7th Pay Commission Latest News)

7th Pay Commission
Post Office FD Scheme: 'या' योजनेत करा पैसे जमा, बँकेपेक्षा मिळेल जास्त फायदा

34000 रुपयांपर्यंत वाढणार पगार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार DA 5 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. जर 5 टक्के वाढ झाली तर तुमच्या पगारात सुमारे 34000 रुपयांनी वाढ होणार आहे.

एआयसीपीआय डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार,

एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. या आकडेवारीवरूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये किती वाढ होणार हे निश्चित होत असते. AICPI निर्देशांकानुसार, मार्च 2022 यामध्ये वाढ झाली आहे, हे पाहता यावेळी कर्मचाऱ्यांना 5 टक्के वाढीव भत्ता मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

डीए 39 टक्के असू शकतो,

यावेळी सरकारने महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यत वाढणार आहे. सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवत असते, जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते.

7th Pay Commission
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता; जाणून घ्या गोव्यातील दर

एप्रिलमध्ये 127चा आकडा ओलांडलेल्या या निर्देशांकात 2022 च्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये या निर्देशांकात घसरण झाली होती, परंतु तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तो जानेवारीत 125.5, फेब्रुवारीत 125 आणि मार्चमध्ये 126 एवढा होता. त्याच वेळी, हा डेटा एप्रिलमध्ये 127.7 वर आला. मे आणि जूनमध्ये 127 च्या वर राहिल्यास सरकार डीए 5 टक्क्यांनी वाढवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com