7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता वाढण्याचा मार्ग मोकळा

7th Pay Commission: तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देणार आहे.
Indian Money
Indian MoneyDainik Gomantak

7th Pay Commission: तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देणारी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. जुलै महिन्याची AICPI निर्देशांकाची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. जूनच्या तुलनेत त्यात 0.7 अंकांची वाढ झाली आहे. जूनमध्ये हा आकडा 129.2 होता, जो जुलैमध्ये वाढून 129.9 झाला आहे. या वाढीमुळे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

28 सप्टेंबर रोजी घोषणा

जुलै ते डिसेंबर या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर आधारित, पुढील वर्षी जानेवारीमध्ये महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढेल. जानेवारी ते जून या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे जुलै महिन्यातील महागाई भत्त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. जुलैचा महागाई भत्ता सरकार 28 सप्टेंबरला जाहीर करेल, असा दावा सूत्रांनी केला आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

Indian Money
7th Pay Commission: जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 5 टक्कांची वाढ

दोन महिन्यांची थकबाकी मिळेल

7व्या वेतन आयोगाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो. त्याचा आधार सहा महिन्यांचा AICPI निर्देशांक असतो. यावेळी जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या थकबाकीसह सप्टेंबर महिन्याचा पगार मिळणार आहे.

DA किती वाढेल

यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यानंतर ते 34 वरुन 38 टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. डीए 38 टक्के असल्याने पगारात चांगली वाढ होईल.

Indian Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच होणार वाढ

कामगार मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकाच्या आधारे अंदाजित केला जातो. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे. AICPI प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी रिलीज होतो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com