DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, 6 टक्क्यांनी वाढला DA!

DA Hike Latest News: देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Money
MoneyDainik Gomantak

DA Hike Latest News: देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ केली आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट मिळणार आहे. तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे, याविषयी जाणून घेऊया...

कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार?

केंद्र सरकारनंतर (Central Government) राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे. यावेळी राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या (Employees) डीएमध्ये 6 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

Money
7th Pay Commission DA Hike: RJ, KA, DL नंतर झारखंडने दिली सरकारी कर्मचाऱ्यांना भेट

आता तुम्हाला किती DA मिळेल?

राज्य सरकारने केलेल्या या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना 34 टक्के डीए मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

15 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार

याविषयी माहिती देताना एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, सध्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के दराने डीए मिळत असून तो 34 टक्के करण्यात येणार आहे. या पगारवाढीमुळे राज्य सरकारवर दरमहा 15 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

Money
DA Hike: तोहफा, तोहफा, तोहफा! केजरीवाल सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

कर्मचारी तब्बल 4 महिने वाट पाहत होते

गेल्या 4 महिन्यांपासून कर्मचारी पगारवाढीच्या प्रतीक्षेत होते, त्यावर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकीही मिळावी, अशी मागणी केली जात आहे. बर्गे म्हणाले की, एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी. अनेक दिवसांपासून राज्य सरकारने पैसे दिलेले नाहीत.

Money
DA Hike in Maharashtra: सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 3 टक्क्यांनी वाढ

जवळपास 5 महिने कर्मचारी संपावर होते

MSRTC मध्ये सध्या सुमारे 80,000 कर्मचारी आहेत. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ कर्मचारी संपावर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com