7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, डीएनंतर आणखी एका भत्त्यात वाढ

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीच वाढला आहे.
Money
MoneyDainik Gomantak

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीच वाढला आहे. केंद्र सरकारने आता कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. आधी महागाई भत्त्यात वाढ झाली होती आणि आता प्रवास भत्त्यातही (TA) वाढ झाली आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांच्या खात्यात पुन्हा एकदा मोठी रक्कम येणार आहे.

दरम्यान, महागाई (Inflation) भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या टीएमध्ये वाढ झाली आहे. मात्र आता ट्रॅवलिंग ग्रेड वाढवण्यात आली आहे. मात्र आता ट्रॅवलिंग ग्रेड वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) आता राजधानी आणि दुरंतो एक्स्प्रेस व्यतिरिक्त तेजस ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडेच महागाई भत्त्यात 4% ने वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचार्‍यांचा एकूण डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढला असून, डीएमध्ये वाढ झाल्याचा परिणाम टीएवर दिसून येत आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, नवीन वर्षापूर्वी वाढणार एवढा पगार !

प्रवास भत्त्याचा लाभ मिळेल

अर्थ मंत्रालयाच्या वित्त विभागा (DoE) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर तेजस ट्रेनने प्रवास करु शकतील. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत प्रवासाच्या योजनांसाठी ही ट्रेन वापरण्याची परवानगी दिली आहे. वास्तविक, IRCTC ची तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी आणि प्रीमियम श्रेणीची ट्रेन आहे. वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर आता कर्मचारी तिच्याने प्रवास करु शकणार आहेत.

TA गणना पाहा

वास्तविक, प्रवास भत्ता पे मॅट्रिक्स स्तराच्या आधारावर 3 श्रेणींमध्ये विभागलेला आहे. पहिली श्रेणी – हायर ट्रान्सपोर्ट अलाउन्स शहराचा आहे. यासाठी TA गणनेचे सूत्र आहे की, एकूण वाहतूक भत्ता = TA + [(TA x DA% )\/100].

Money
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली मोठी घोषणा

कोणत्या श्रेणीमध्ये किती TA उपलब्ध आहे हे जाणून घ्या?

आता TA ची गणना कशी केली जाते याबद्दल जाणून घेऊया. या अंतर्गत, TPTA 1-2 साठी 1350 रुपये, 3-8 स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी 3600 रुपये आणि 9 वरील स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी 7200 रुपये आहे. या अंतर्गत लेव्हल 9 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना जास्त वाहतूक भत्ता असलेल्या शहरांसाठी 7,200 रुपयांचा TA+DA मिळतो. इतर शहरांसाठी, हा भत्ता रुपये 3,600 +DA आहे. त्याचवेळी, 3-8 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 3,600 अधिक DA आणि 1,800 अधिक DA मिळतो, लेवल 1 आणि 2 बद्दल बोलत असताना, प्रथम श्रेणीतील शहरांसाठी 1,350 रुपये +DA मिळते, तर इतर शहरांसाठी 900 रुपये.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली भेट! सरकारने केली ही मोठी घोषणा

या कर्मचाऱ्यांना अधिक टी.ए

ज्या कर्मचाऱ्यांना कारची सुविधा मिळाली आहे, ज्यामध्ये कॅबिनेट सचिव स्तराचे अधिकारी येतात, त्यांना दरमहा 15,750 रुपये + डीए दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com