7th Pay Commission Update
7th Pay Commission Update Dainik Gomantak

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, DA थकबाकीनंतर फिटमेंट फॅक्टर कन्फर्म!

7th Pay Commission Fitment Factor Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे.

7th Pay Commission Fitment Factor Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे. फिटमेंट फॅक्टरबाबत सरकार या महिन्यात निर्णय घेऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होईल. यासाठी एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो सरकारसोबत शेअर केला जाणार आहे. युनियनने एक मोठी अपडेट दिली आहे. यावर सरकारशी सहमती झाल्यास 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वाढवता येईल.

युनियन बदलाची मागणी करत आहे

सरकारने अलीकडेच कर्मचार्‍यांच्या (Employees) महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना जुलैपासून वाढीव महागाई भत्ता आणि महागाई (Inflation) सवलतीचा लाभ मिळणार आहे. आता यात बदल झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पगारावर दिसून येईल. फिटमेंट फॅक्टरबाबत पुढील महिन्यापर्यंत बैठक होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत.

7th Pay Commission Update
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली भेट! केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

पगारात महत्त्वाची भूमिका

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे, जो 3.68 पट वाढवला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल म्हणजे त्याचा तुमच्या पगारावरही परिणाम होईल. वास्तविक, याच आधारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवले ​​जाते.

2017 मध्ये मूळ वेतन वाढवण्यात आले

फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 वर वाढवल्यास, किमान मूळ वेतन 18 हजार वरुन 26 हजार रुपये होईल. यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरकारने वाढ केली होती. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18 हजार रुपये, तर कमाल वेतन 56,900 रुपये आहे.

7th Pay Commission Update
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! या नियमात झाला मोठा बदल

कॅलक्युलेशन पाहा

जर सरकारने फिटमेंट फॅक्टर 3 वेळा केला, तर भत्ते वगळता कर्मचाऱ्यांचे वेतन 18,000 X 2.57 = 46,260 रुपये होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केल्यास पगार 26000X3.68 = 95,680 रुपये होईल. 3 पट फिटमेंट फॅक्टरवर पगार 21000X3 = 63,000 रुपये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com