Adani vs Hindenburg: एक रिपोर्ट आणि अदानींचे 48000 कोटींचे नुकसान; नेमका काय आहे हिंडेनबर्ग रिपोर्ट?

अमेरिकन कोर्टात येण्याचे हिंडेनबर्गकडून आव्हान; 88 प्रश्नांची उत्तरे अदानी ग्रुपला देता आली नाहीत
Adani vs Hindenburg
Adani vs HindenburgDainik Gomantak

Hindenburg Report on Adani Group: अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या एका रिपोर्टमुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना 48 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात सर्व काही आलबेल नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे, असा आरोपही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

हा रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समुहाने याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला आहे. तथापि, हिंडेनबर्ग रिर्सचकडून समुहाला आव्हान देण्यात आले आहे. आम्ही जिथे काम करतो, तिथे म्हणजे अमेरिकेतील न्यायालयातही याचिका दाखल करा.

आमच्याकडे दस्तऐवजांची एक मोठी यादी आहे. आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत, कोणतीही कायदेशीर कारवाई निष्फळ ठरेल, असे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे.

ब्लूमबर्गच्या अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांची संपत्ती 113 अब्ज डॉलरवर आली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.

अदानी समूहाने याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. हिंडेनबर्गने ट्विटरवर लिहिले की, अदानी समूहाने अहवालात उपस्थित केलेल्या 88 थेट प्रश्नांपैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही.

काय आहेत रिपोर्टमधील प्रश्न?

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला विचारले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे भाऊ राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे? त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात कागदपत्रे आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.

हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचा मेहुणा समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले? असे एकूण 88 प्रश्न या अहवालातून विचारण्यात आले आहेत.

हिंडेनबर्गकडून अनेक कंपन्यांचा भांडाफोड

हिंडेनबर्गने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. हिंडेनबर्ग रिसर्च ही कंपनी कोणत्याही कंपनीत होणारी गडबड, घोटाळे शोधते आणि नंतर त्याबद्दलचा अहवाल प्रकाशित करते.

ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे. जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. कंपनीने 2017 पासून 16 कंपन्यांमधील आर्थिक घोटाळा उघड केला आहे.

दरम्यान, अदानी समूहाने गुरुवारी म्हटले होते की, अमेरिकन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चविरुद्ध कायदेशीर कारवाईचे पर्याय अदानी समुह शोधत आहे.

तर हिंडेनबर्ग रिसर्चने ने त्यांच्या अहवालावर ठाम असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड'मध्ये गुंतल्याचा आरोप केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com