
Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना अनेक वेळा आपण चुकीची माहिती भरतो किंवा काही इतर गोष्टी भरायला विसरतो, ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आधार कार्ड बनवताना योग्य माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे.
UIDAI ने आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, तुम्ही कितीही वेळा माहिती अपडेट करु शकत नाहीत.
आधार कार्ड (Aadhar Card) इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे असते कारण त्यात बायोमेट्रिक असते. त्यामुळे ती योग्य माहितीसह अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हालाही समस्या येऊ शकतात.
तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे नाव फक्त 2 वेळा बदलू शकता. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असल्यास किंवा तुम्हाला लग्नानंतर तुमचे आडनाव बदलायचे असेल तर तुम्ही ते बदलू शकता. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीही करु शकता.
अनेक वेळा असे घडते की, आधार कार्ड बनवताना चुकीच्या पद्धतीने जेंडरविषयी माहिती भरली जाते. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही फक्त 1 वेळा बदलू शकता.
जर जन्मतारीख चुकीची टाकली असेल, तर तुम्ही ती फक्त 1 वेळा बदलू शकता.
घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन यासारखी काही माहिती आधार कार्डवर वारंवार बदलली जाऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.