सरकारी वेबसाइटवरून करोडो शेतकऱ्यांचा आधार डेटा लीक

भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तावेज असलेले आधार कार्डचा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे.
सरकारी वेबसाइटवरून करोडो शेतकऱ्यांचा आधार डेटा लीक
Farmers Aadhar Card Data Leak from Government SiteDainik Gomantak

भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तावेज असलेले आधार कार्ड (Adhar Card) चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. यामध्ये लोकांची वैयक्तिक माहिती असते, तिचा गैरवापरही होऊ शकतो, यावेळी एका सरकारी वेबसाइटवरून आधार डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. (Aadhaar data leak of crores of farmers from government website)

Farmers Aadhar Card Data Leak from Government Site
शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स 60 तर निफ्टी 30

सुरक्षा संशोधकाच्या अहवालानुसार, देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरून सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांचा आधार डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. हा डेटा चुकीच्या हाती लागल्यास सायबर त्याचा गैरवापर देखील करू शकतो. याआधी सुद्धा लोकांना आधार डेटा लीकच्या समस्येतून जावे लागले आहे.

सुरक्षा संशोधक अतुल नायर यांनी माध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले की नोंदणीकृत शेतकऱ्यांचे आधार क्रमांक पीएम किसान योजना वेबसाइटच्या एका भागाद्वारे लीक करण्यात येत आहेत. पोर्टलवरील वेबसाइटचा एक भाग पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक दाखवत होता. जानेवारीच्या उत्तरार्धात ही समस्या संशोधकाच्या लक्षात आली आणि भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) देखील कळवण्यात आले आहे.

कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने तात्काळ हा अहवाल नोडल एजन्सीमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला आणि काही महिन्यांत ही समस्या दूर देखील झाली. नायर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जानेवारीमध्ये आलेली ही समस्या मे अखेरीस पूर्णपणे दूर झाली आहे. CERT-In ने देखील वेळेत समस्या उघड केल्याबद्दल आणि त्याचे निराकरण करण्यात मदत केल्याबद्दल संशोधकाचे कौतुक केले.

Farmers Aadhar Card Data Leak from Government Site
जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

सरकारने शेतकऱ्यांना थेट रोख लाभ देण्यासाठी 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे या शासकीय संकेतस्थळावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पुर्ण आहे. योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात, ज्याचा हप्ता दर चार महिन्यांनी थेट खात्यात 2000 रुपयांच्या स्वरूपात जमा करण्यात येतो.

सरकारी वेबसाइटवरून आधार कार्डचा तपशील लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. 2019 मध्ये झारखंड सरकारने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचा आधार डेटा लीक केल्याचा देखील आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com