Aadhar Card: या कालावधीत आधारकार्ड अपडेट केले नाही तर लागतील पैसे

Aadhar Card: आधारकार्डसंबंधित आपली कागदपत्रे अपडेट करणे गरजेचे आहे असा नियम जारी केला आहे.
Aadhar card
Aadhar cardDainik Gomantak

Aadhar Card: संपूर्ण भारतात आधार कार्डला महत्वाचे कागदपत्र म्हणून महत्व आहे. आता आधारकार्डबाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI ) 14 जून पर्यत आधारकार्डासंबंधी कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा जारी केली आहे.

आधार पोर्टलवर याआधी कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 25 रुपए भरावे लागत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युआयडीएआयने भारतीय नागरिकांना आपली कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा मोफत करण्याचे ठरवले आहे. ही सुविधा 15 मार्चपासून 15 जूनपर्यत तीन महिन्यांसाठी असणार आहे.

Aadhar card
Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, दरमहा मिळणार 70,500 रुपये; अर्थमंत्र्यांची घोषणा!

आधारकार्डमध्ये याआधी केलेल्या दुरुस्तीनुसार, आधारकर्त्याने आधारकार्डची नोंदणी केल्यापासून 10 वर्षानंतर आपली आधारकार्डसंबंधित आपली कागदपत्रे अपडेट करणे गरजेचे आहे असा नियम जारी केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा फक्त आधार पोर्टलवर मोफत असणार आहे. इतर ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपए द्यावे लागतील .

काही दिवसांपूर्वी युआयडीएआयने जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटले होते की, जर तुम्ही 10 वर्षापूर्वी आधारकार्ड( Aadhar-card ) काढले असेल तर त्यासंबंधी ओळखपत्र आणि राहण्याचे ठिकाण याबाबत कागदपत्रे अपडेट करा असे आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com