Aadhar Card: मौका मौका! 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले असेल, तर या संधीचा मिळेल लाभ

Modi Government: भारतातील एकूण 128.99 कोटी रहिवाशांना आधार क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
 Aadhar Card
Aadhar Card Dainik Gomantak

Aadhar Card Update: केंद्र सरकार देशातील नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याची महत्त्वाची संधी देत ​​आहे. आधार कार्ड (Aadhar card) अपडेट करताना, गेल्या दशकभरात झालेले बदल आधारमध्ये अपडेट केले जाऊ शकतात. भारतातील एकूण 128.99 कोटी रहिवाशांना आधार क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अशा व्यक्ती ज्यांनी 10 वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले होते. त्यानंतर या वर्षांत कधीही अपडेट केलेले नाही, अशा आधार क्रमांक धारकांना दस्तऐवज अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.

 Aadhar Card
Aadhar Card Updates: डेमोग्राफिकसाठी 50 तर बायोमेट्रिकसाठी 100 रुपये शुल्क निश्चित

दुसरीकडे, गेल्या दहा (10) वर्षांमध्ये, आधार क्रमांक व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून समोर आला आहे. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी, सर्वसामान्यांना आधार क्रमांक लाभदायी ठरतो.

 Aadhar Card
Aadhar Update: आता आधार लिंक्ड पेमेंट सिस्टम या नवीन वैशिष्ट्यासह आणखी सुरक्षित...

त्यानुसार, UIDAI ने या संदर्भात आधार क्रमांक धारकांना विहित शुल्कासह दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी माय आधार पोर्टलद्वारे नागरिक (Citizens) जवळच्या नोंदणी केंद्राला भेट देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com