Adani Group: अदानी प्रकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका नाही!

अदानी प्रकरण उफाळून आल्यावरही गेल्या दोन दिवसांत भारताचा परकी चलनसाठा आठ अब्ज डॉलरने वाढला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाअजिबात हादरा बसलेला नाही हे दिसते.
 Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak

Adani Group: ‘‘अदानी प्रकरण उफाळून आल्यावरही गेल्या दोन दिवसांत भारताचा परकी चलनसाठा आठ अब्ज डॉलरने वाढला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा ढाचा किंवा तिची प्रतिमा यांना अजिबात हादरा बसलेला नाही हे दिसते,’’ असा ठाम विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल येथे व्यक्त केला.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारामन यांनी आज मुंबईत उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आदींशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेतल्या. यानंतर पत्रकारांसमोर त्यांनी अदानी पेचप्रसंगाबाबत उपरोक्त विधान केले.

मोठ्या रकमेचा हप्ता असलेल्या विमा पॉलिसीला करसवलतीतून वगळणे तसेच प्राप्तिकर आकारणीच्या नव्या रचनेत जाण्यास करदात्यांना प्रोत्साहित करणे या तरतुदींचेही त्यांनी समर्थन केले. अदानी प्रकरणाने आपल्या प्रतिमेला हानी पोहोचली असती तर दोन दिवसांत आपला परकीय चलनसाठा आठ अब्ज डॉलरने वाढलाच नसता.

‘एफपीओ’ मागे घेणे, परकी वित्तसंस्थांचा निधी येणे-जाणे या गोष्टी सर्वत्रच होतात. अदानी समूहाला किती कर्जे दिली? हे बँका, एलआयसी यांनी जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेनेही यासंदर्भात विधान केले आहे, ‘सेबी’सारखे बाजार नियामक यासंदर्भात आपले काम करण्यास स्वतंत्र आहेत, योग्य ते निर्णय घेण्याची मोकळीक त्यांना आहे, असेही त्या म्हणाल्या.

 Nirmala Sitharaman
Mahadayi Water Dispute: म्हादई प्रश्नावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सारवासारव

नवा प्राप्तिकर

जुनी प्राप्तिकर आकारणी रचना संपवून पूर्णपणे नवी रचना कधी लागू होणार? याची निश्चित कालमर्यादा ठरविली नाही, असे सांगतानाच नव्या रचनेचे त्यांनी समर्थन केले. करदात्यांनी बचत कमी करावी, हा यामागील सरकारचा हेतू नाही. कारण करदात्यांना यापैकी कोणत्याही रचनेत जाण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर कोणत्याही रचनेची सक्ती नाही.

उलट आम्ही जुनी करप्रणाली सुटसुटीत करीत आहोत. यात बचत करण्यापासून करदात्यांना परावृत्त करणे हा हेतू असल्याच्या कथा का पसरविल्या जात आहेत? अशा शब्दांत सीतारामन यांनी प्रतिहल्ला केला. उलट आता नव्या कररचनेत करदात्यांना आणखी वेगवेगळे पर्याय आहेत, असे या वेळी सांगितले; तर सीतारामन यांनी आम्ही करदात्यांना नवे चांगले घर देत आहोत, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com