Adani Group ची डील फायनल, 'या' कंपनीतील 50 टक्के हिस्सा करणार खरेदी!

Gautam Adani Latest News: अदानी रिन्यूएबल एनर्जी (Adani Green Energy) ने यावर्षी ऊर्जा कंपनीतील 50 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak

Adani Group News: अदानी समूह नवीन वर्षात आणखी एक कंपनी ताब्यात घेणार आहे. अदानी रिन्यूएबल एनर्जी (Adani Green Energy) ने यावर्षी ऊर्जा कंपनीतील 50 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा करार 15 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. या कराराचा खुलासा करताना अदानी समूहाने सांगितले की, हा करार एस्सेल सोलर एनर्जी कंपनीसोबत केला जात आहे.

50 टक्के शेअर्स राजस्थान सरकारकडे राहतील

अदानी ग्रीन एनर्जीने 17 जानेवारी 2023 रोजी एस्सेल इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत निश्चित करार केला आहे. उर्वरित 50 टक्के समभाग राजस्थान सरकारकडे राहतील. अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग टू लिमिटेडचा राजस्थानमध्ये 750 मेगावॅट क्षमतेचा सोलर पार्क आहे. 2021-22 मध्ये त्याची उलाढाल 9.87 कोटी रुपये होती.

Gautam Adani
Adani Group: गौतम अदानी 1 लाख कोटी करणार खर्च, 'या' भाजपशासित राज्यासाठी बनवला प्लॅन!

शेअर्समध्ये तेजी

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 5 ट्रेडिंग दिवसांमध्ये कंपनीचे स्टॉप 10.52 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत शेअरचे मूल्य 198.50 रुपयांनी वाढून 2,085.50 च्या पातळीवर पोहोचले आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 3,050.00 रुपये आहे आणि लोवर लेवल 1,650.20 रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com