Adani Group: अदानी समूह व्हिएतनाममध्ये करणार मोठी गुंतवणूक, अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये...

Adani Group: अदानी समूह व्हिएतनाममधील बंदर आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये $3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak

Adani Group: अदानी समूह व्हिएतनाममधील बंदर आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये $3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. व्हिएतनाम सरकारने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

अदानी पोर्ट्सचे सीईओ करण अदानी यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेतली. बैठकीनंतर व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी अदानी समूहाच्या गुंतवणुकीचे संकेतही दिले.

$10 अब्ज पर्यंत गुंतवणूक

या बैठकीनंतर करण अदानी यांनी सांगितले की, 'हा देश भारतातील (India) मोठ्या कंपन्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास तयार आहे.' व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी अदानी समूहाचे देशात स्वागत केले आहे. असे मानले जात आहे की, अदानी समूह व्हिएतनाममध्ये दीर्घकालीन 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल.

Gautam Adani
Adani Group: अदानी ग्रुपच्या शेअर्समधून 100 दिवसांत 7683 कोटींची कमाई

शेअर्स पडले

दरम्यान, बुधवारी अदानी समूहाची (Adani Group) कंपनी अदानी पोर्ट्सचे शेअर्स 2.13 टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग सहा टक्क्यांनी घसरल्याने बुधवारी सात समूह कंपन्यांचे समभाग तोट्यासह बंद झाले.

तर, अदानी विल्मरचे शेअर्स 4.99 टक्के, ACC शेअर्स 2.15 टक्के, अदानी पॉवर 1.63 टक्के, अंबुजा सिमेंट्स 1.25 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी 0.52 टक्के घसरले.

Gautam Adani
Adani Group: हिंडनबर्ग प्रकरणी अदानी समुहाला दिलासा; प्रथमदर्शनी कोणतेही उल्लंघन नसल्याची अहवालात माहिती

तथापि, अदानी ट्रान्समिशनचा हिस्सा 5 टक्के, अदानी टोटल गॅसचा हिस्सा 5 टक्के आणि एनडीटीव्हीचा हिस्सा 4.98 टक्क्यांनी वाढला. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून समूह कंपन्यांचे शेअर्स नफ्यात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com