Adani Wilmar ने कमी केल्या खाद्यतेलांच्या किमती; शेअरमध्ये मोठी घसरण

आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या अदानी समूहाच्या अदानी विल्मार या कंपनीला खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या आहेत.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak

आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या अदानी समूहाच्या अदानी विल्मार (Adani Wilmar) या कंपनीला खाद्यतेलाच्या किमती केल्या आहेत. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे, सोमवारी सकाळी अदानी विल्मारचा शेअर 5 टक्क्यांवर गेला आणि त्यामुळे शेअरला लोअर सर्किट लागला. अदानी विल्मरचा शेअर सकाळी 578 रुपयांवर उघडला होता तर तो 5 टक्क्यांनी घसरून 555.50 रुपयांवर आला. (Adani Wilmar lowers edible oil prices Big drop in shares)

Gautam Adani
जाणून घ्या, तुमच्या शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर

कंपनीने केले खाद्यतेल स्वस्त,

प्रत्यक्षात अदानी विल्मारने सर्वसामान्यांना दिलासा देत खाद्यतेलाच्या किमती 10 रुपयांनी कमी केल्या आहेत. अदानी विल्मरने फॉर्च्यून रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलच्या एका लिटर पॅकची किंमत (MRP) 220 रुपयांवरून 210 रुपयांपर्यंत कमी केली आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे फॉर्च्युन सोयाबीन आणि फॉर्च्युन कच्छी घणी (मोहरी तेल) च्या एक लिटर पॅकची एमआरपी 205 रुपयांवरून 195 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. कंपनीच्या या निर्णयामुळे महागडे खाद्यतेल वापरणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. पण कंपनीचा हा निर्णय बाजार पेठांना आवडलेला नाहीये. अदानी विल्मरच्या शेअरमध्ये सध्या मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

अदानी विल्मार बनला मल्टीबॅगर स्टॉक

अदानी ग्रुप्सची FMCG कंपनी आणि अदानी विल्मारचा IPO, संपूर्ण आशियातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या IPO पैकी एक आहे. अलीकडच्या काळात संपूर्ण आशियामध्ये IPO घेऊन आलेल्या सर्व कंपन्यांपैकी गौतम अदानी यांची कंपनी Adani Wilmar ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Gautam Adani
गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये 230 रुपये प्रति शेअर या दराने IPO आणला होता. जो आता 560 रुपयांच्या आसपास बाजार पोठांमध्ये व्यवहार करत आहे. म्हणजेच अदानी विल्मरच्या IPO ने गुंतवणूकदारांना IPO किमतीच्या 142 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे तर 230 रुपयांच्या या शेअरनेही 878 रुपयांची पातळी गाठली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com