Edible Oil Price Reduced: अदानी विल्मरने खाद्यतेलात केली 30 रुपयांनी कपात, जाणून घ्या नवे दर

Adani Wilmar Oil Price Reduced: अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारने खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात केली आहे
Edible oil prices decreases
Edible oil prices decreasesDainik Gomantak

अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारने खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात केली आहे. काल म्हणजेच सोमवारी, कंपनीने आपल्या खाद्यतेलाच्या अंतर्गत येणाऱ्या काही तेलांच्या किमती 30 रुपयांनी प्रतिलिटर कमी करणार असल्याची घोषणा केली. कंपनीचे खाद्यतेल फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत बाजारात विकले जाते. (adani wilmar slashes edible oil prices 30 rupees per litre check new rates news)

* अदानी विल्मरच्या खाद्यतेलाच्या किमती किती कमी झाल्या

फॉर्च्युन सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची कपात करण्यात आली असून ते 195 रुपयांवरून 165 रुपये प्रतिलिटरवर आणण्यात आले आहे.

राइस ब्रान तेलाच्या दरात 15 रुपयांनी कपात करण्यात आली असून त्याची किंमत 225 रुपये प्रति लिटरवरून 210 रुपये झाली आहे.

सनफ्लावर तेलाच्या दरात प्रतिलिटर 11 रुपयांनी कपात करण्यात आली असून ते प्रतिलिटर 210 रुपयांवरून 199 रुपयांवर आले आहे.

सरसोच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी कपात करण्यात आली असून ते 195 रुपयांवरून 190 रुपये प्रतिलिटरवर आणण्यात आले आहे.

Edible oil prices decreases
उच्च शैक्षणिक संस्थांना मिळाणाऱ्या देणग्या 100% करमुक्त! संसदीय समितीची शिफारस

* नवीन स्वस्त तेल कधी येणार,
अदानी विल्मरने एका निवेदनात सांगितले, लवकरच हे नवीन स्वस्त तेल भारतीय बाजारपेठेत पोहोचेल आणि या कमी झालेल्या तेलाच्या किमतींचा फायदा भारतीय (India) ग्राहकांना घेता येणार आहे.

* अदानी विल्मारने किंमत का कमी केली
अदानी विल्मारने जागतिक तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या आहेत. अदानी विल्मर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर किमतीतील कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांपर्यंत चांगलाच पोहोचला, त्यामुळे हा फायदा घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com