सिमेंटनंतर आता गौतम अदानी 'या' क्षेत्रात टाटा-अंबानींना देणार टक्कर

जगातील पाचव्या तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आता आरोग्य क्षेत्रात टाटा आणि अंबानींना आव्हान देणार आहेत.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak

जगातील पाचव्या तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता आरोग्य क्षेत्रात टाटा आणि अंबानींना (Tata and Ambani) आव्हान देणार आहेत. गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने तिच्या मालकीची उपकंपनी, अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेडद्वारे आरोग्य सेवांमध्ये प्रवेश केला. (After Cement Gautam Adani will now compete with Tata Ambani in this area)

Gautam Adani
महागाईची आग स्वयंपाकघरात, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत हजारांच्या पार

गौतम अदानी म्हणाले की, हेल्थकेअर उपक्रम लवकरात लवकर काम सुरू करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात अदानी समूहाने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा भारतीय व्यवसाय 81,000 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

गौतम अदानी यांनी 81 हजार कोटींना ACC आणि अंबुजा सिमेंट विकत घेतले आहे. अदानी म्हणाले की, या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. ही पोकळी आम्ही लवकरात लवकर भरून काढू आणि येत्या पाच वर्षांत उत्पादन दुप्पट करू.

इस्रायली कंपनीत हिस्सा घेतला विकत

अदानी एंटरप्रायझेसच्या उपकंपन्यांमध्ये वैद्यकीय आणि निदान सुविधा, आरोग्य सहाय्य, आरोग्य आधारित सुविधा, संशोधन केंद्रे आणि मूलभूत आरोग्य सुविधांची स्थापना, या सर्व गोष्टी आता अदानी चालवणार आहेत.

Gautam Adani
GST परिषदेच्या शिफारशी केंद्र आणि राज्यांवर बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अदानी एंटरप्रायझेस, अदानी समूहाने तयार केलेल्या नवीन व्यवसायांसाठी इनक्यूबेटर, फॉरसाइट रोबोटिक्स या इस्रायली स्टार्टअपमध्ये अल्पसंख्याक भागभांडवल विकत घेतला आहे. यासाठी समूहाने 2 डॉलर्सची गुंतवणूक केली. फोरसाइट रोबोटिक्स नेत्ररोग शस्त्रक्रियेमध्ये देखील माहिर आहे.

टाटा आणि रिलायन्सला मिळेल आव्हान

आरोग्य सेवा क्षेत्रात टाटा आणि रिलायन्स समूहाचे मोठे अस्तित्व आहे. या क्षेत्रात अदानीचा प्रवेश टाटा आणि अंबानींना कडवे आव्हान देऊ शकते. भारतीय बहुराष्ट्रीय समूहाने 2014 मध्ये आधीच फार्मा मार्केटमध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हापासून रिटेल, लॉजिस्टिक आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रातील 30 कंपन्यांचे अधिग्रहण केले.

सिमेंट क्षेत्रात अदानीचा मोठा दबदबा

गौतम अदानी यांनी 10.5 अब्ज डॉलर म्हणजेच 81 हजार कोटी रुपयांना होल्सिम ग्रुपकडून भारतीय व्यवसाय खरेदी केला. हा करार पूर्ण झाल्यावर गौतम अदानी सिमेंट ब्रँड ACC आणि अंबुजा सिमेंट ताब्यात घेणार आहेत. आता ती देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे. अदानी देशातील सर्वात मोठा व्यावसायिक बंदर व्यवसाय आणि अक्षय ऊर्जा व्यवसाय चालवत आहे. ते म्हणाले की ते अंबुजा आणि एसीसी सिमेंटची उत्पादन क्षमता दुप्पट करून पुढील पाच वर्षांत दरवर्षी 140 दशलक्ष टन करणार आहेत.

मीडिया उद्योगात प्रवेश

AMG Media Networks Limited, अदानी एंटरप्रायझेसची पूर्ण मालकीची उपकंपनी, Quintillion Business Media Limited मधील 49 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. 1 मार्च 2022 रोजी, अदानी एंटरप्रायझेसने क्विंटिलियन बिझनेस मीडिया लिमिटेडमधील अल्पसंख्याक स्टेक खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com