बजेटपूर्वी जीएसटीने पुन्हा केंद्राला दिला मदतीचा हात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

यंदाच्या आर्थिक वर्षातील म्हणजेच 2020-21 मधील डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यात देखील जीएसटी वसुलीने एक लाख कोटींचा आकडा पार केला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी मध्ये जीएसटी संकलन तब्बल 1,19,847 कोटी रूपये झाले आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षातील म्हणजेच 2020-21 मधील डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यात देखील जीएसटी वसुलीने एक लाख कोटींचा आकडा पार केला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी मध्ये जीएसटी संकलन तब्बल 1,19,847 कोटी रूपये झाले आहे. शिवाय हे संकलन मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातील महसूलपेक्षा आठ टक्क्यांनी जास्त झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 

चालू आर्थिक वर्षातील 2020-21 ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अप्रत्यक्ष कराच्या जीएसटी वसुलीने एक लाख कोटींचा टप्पा गाठला होता. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात देखील जीएसटीच्या वसुलीने एक लाख कोटींचा आकडा गाठत, ही प्रणाली लागू झाल्यापासून सर्वात अधिक महसूल गोळा केला आहे. अप्रत्यक्ष कर म्हणून जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आली होती. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात जीएसटीने 1,15,174 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. तर याअगोदर, एप्रिल 2019 मध्ये जीएसटीने सर्वाधिक 1,13,866 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा जीएसटीने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. या महिन्यात केंद्राला 1,05,155 कोटी रुपये जीएसटी मधून मिळाले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात देखील 1,04,963 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा झाला होता. व डिसेंबर महिन्यात 1,13,866 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. त्यानंतर आता सलग चौथ्या महिन्यात देखील जीएसटीने एक लाख कोटी रुपयांची सुवर्ण रेषा पार केली आहे. त्यामुळे जीएसटीच्या कर संकलनातील वाढ व त्याच्या विक्रमी टप्प्यामुळे कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या रूळावर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे. 

जानेवारी महिन्यात केंद्र सरकारला सीजीएसटी मधून 21,923 कोटी, एसजीएसटीतुन 29,014 कोटी आणि आयजीएसटीच्या माध्यमातून 60,288 कोटी, असे एकूण 1,19,847 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तसेच डिसेंबर पासून ते 31 जानेवारी 2021 पर्यंत दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी रिटर्न्सची एकूण संख्या 90 लाखांवर पोहचली असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे.       

संबंधित बातम्या