Share Market : सलग पाच सत्रव्यवहारानंतर भांडवली बाजाराने नोंदवली काहीशी तेजी  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

देशातील भांडवली बाजाराने आठवड्याच्या पहिल्या सत्रात मोठी आपटी नोंदवल्यानंतर आज दुसऱ्या सत्रव्यवहारात किंचितशी तेजी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आठवड्याच्या पहिल्या सत्रात मोठी आपटी नोंदवल्यानंतर आज दुसऱ्या सत्रव्यवहारात किंचितशी तेजी नोंदवली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 7.09 अंकांची बढत घेत 49,751.41 वर बंद झाला. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32.10 अशांनी वधारून 14,707.80 वर स्थिरावला. आज व्यवहाराच्या दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा बीएसई 49,994.85 वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई 14,782.25 खुला झाला. यानंतर सकाळी सेन्सेक्स मध्ये तेजी दिसून आली. व यावेळेस बीएसईने 50 हजाराची पातळी ओलांडत 50,327.31 आणि एनएसईने 14,854.50 पर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दोन्ही भांडवली बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. 

रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी घोषणा ऑईल-टु-केमिकल्स या नव्या कंपनीचे अनावरण

शेअर बाजारातील दोन्ही निर्देशकांनी काल आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मोठी आपटी नोंदवली होती. तर मागील आठवड्याच्या शेवटच्या चार सत्रात देखील दोन्ही निर्देशक घसरले होते. त्यानंतर आज सलग पाच व्यवहारानंतर शेअर बाजारातील सेन्सेक्स व निफ्टीने थोडीशी का होईना तेजी नोंदवली. काल सेन्सेक्स 1145.44 अंकांनी खाली येत 49,744.32 वर बंद झाला होता. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील 306.05 अशांनी घसरून 14,675.70 वर आला होता. 

देशातील इंधनवाढ आणि कोरोनाच्या धास्तीमुळे गुंतवणूकदारांनी मागील काही सत्रापासून विक्रीचे धोरण अवलंबले होते. तसेच नफेखोरीमुळे देखील दबाव वाढून दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवली होती. आज फार्मा आणि बँकिंग कंपन्यांचे समभाग काहीसे खाली आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजारातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, ओएनजीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि यूपीएल या कंपन्यांच्या समभागांनी तेजी नोंदवली. तर कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, अदानी पोर्ट्स यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. 

नोकरदारांचा आधार असलेला EPF कायदा देशात आज लागू झाला होता; काय आहे EPF?

त्यानंतर, मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसीचा समभाग आज सर्वात अधिक 5.55 टक्क्यांनी वधारला. तसेच इंडसइंड बँक, लार्सन आणि टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, एनटीपीसी, टायटन, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, टीसीएस, आयटीसी, डॉक्टर रेड्डीज, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वधारले. आणि महिंद्रा बँक, मारुती, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एशियन पेंट, अ‍ॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांच्या समभागांनी घसरण नोंदवली.  

                 

संबंधित बातम्या