एअर इंडियाच्या विक्रीनंतर आता या '4 उपकंपन्यांची' होणार विक्री?

टाटा समूहाने (TaTa Group) एअर इंडियाला (Air India) 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत ती विमान कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडेल.
Air India
Air IndiaDainik Gomantak

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले आहे की, एअर इंडियाच्या (Air India) खाजगीकरणानंतर सरकारकडे आता अलायन्स AIR सह आणखी चार उपकंपन्या आहेत आणि 14,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या जमीन -इमारती आहेत. मुख्य मालमत्तांच्या कमाईवर काम सुरू करेल.

DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीनंतर आता सरकार त्याच्या चार उपकंपन्यांवर कमाई करेल. या उपकंपन्या भारत सरकारच्या एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) कडे आहेत.

8 ऑक्टोबर रोजी सरकारने जाहीर केले की टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांची कर्जबाजारी राष्ट्रीय विमान कंपनी (National Airlines) एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली आहे. यामध्ये 2,700 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 15,300 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. हा करार डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. पांडे म्हणाले, DIPAM आता एअर इंडियाच्या उपकंपन्यांच्या मुद्रीकरणाच्या योजनेवर काम करेल. या उपकंपन्या भारत सरकारच्या एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) कडे आहेत.

Air India
एअर इंडिया पुन्हा टाटा सन्सकडेच!

AIAHL ची स्थापना 2019 :

उपकंपन्यांची विक्री सुरू होऊ शकली नाही कारण ते सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. जोपर्यंत एअर इंडिया विकली जात नाही, तोपर्यंत आम्ही इतर गोष्टींकडे जाऊ शकत नाही.

या आहेत उपकंपन्या:

  1. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL)

  2. एअरलाईन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड (AASL)

  3. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) आणि

  4. हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (HCI) लिमिटेड.

Air India
गोवा ते लंडन विमानसेवेसाठी 'एअर इंडिया' सज्ज

सरकारला मिळाले फक्त 2700 कोटी :

टाटा समूहाने (TaTa group) एअर इंडियाला 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत ती विमान कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडेल आणि सरकारला 2700 कोटी रुपये रोख म्हणून मिळतील.

एअर इंडियाचा पूर्ण ताफाही उपलब्ध:

DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडेय म्हणाले की, या करारानुसार टाटा समूहाचे अधिग्रहणानंतर एअर इंडियामध्ये 100 टक्के हिस्सा असेल. याशिवाय, एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसमधील 100 टक्के हिस्सा आणि एअर इंडिया SATS मधील 50 टक्के हिस्सा टाटा समूहाकडे गेला. या कराराअंतर्गत टाटा समूहाला एअर इंडियाचा संपूर्ण ताफाही मिळणार आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात 117 वाइड बॉडी विमाने आणि 24 नॅरो बॉडी विमाने असतील. याशिवाय, त्याला एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स आणि महाराजा ब्रँडवर मालकी हक्क असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com