Air India Sale: प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर एअर इंडियाची धमाकेदार ऑफर, तिकीटात बंपर सूट!

Republic Day Sale: काही दिवसातच देश प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्सही देतात.
Air India
Air India Dainik Gomantak

Republic Day Sale: काही दिवसातच देश प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्सही देतात. यानिमित्ताने एअर इंडियाने एक ऑफरही सादर केली असून कमी किमतीत विमान तिकीट देऊ केले आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, एअर इंडियाने देशांतर्गत नेटवर्कवर त्यांच्या फ्लाइट तिकिटांवर ऑफर सुरु केल्या आहेत.

एअर इंडिया

सादर केलेली ही ऑफर 23 जानेवारीपर्यंत वैध असेल. अशा परिस्थितीत, या ऑफर अंतर्गत, 23 जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येईल आणि कमी किमतीत प्रवास करता येईल. या ऑफर अंतर्गत तिकिटे एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया (Air India) बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. या ऑफरमध्ये देशांतर्गत फ्लाइटची तिकिटे कंपनीकडून कमी किमतीत लोकांना दिली जातील.

Air India
Air India Pee-Gate: एअर इंडियाला 30 लाखांचा दंड, पायलटचा परवाना निलंबित

ऑफर

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ही सवलतीची तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत भारतातील देशांतर्गत नेटवर्कवरील प्रवासासाठी लागू होतील. कंपनीने सांगितले की, किंमत 1705 रुपयांपेक्षा कमी वन-वे भाड्यापासून सुरु होईल आणि लोकांना या ऑफर अंतर्गत 49 हून अधिक देशांतर्गत गंतव्यस्थानांवर सूट मिळेल.

Air India
Vistara Air India Merger: रतन टाटांची सर्वात मोठी डील, 'विस्तारा' एअरलाइन्स ताब्यात; जाणून घ्या

एअर इंडियाने दिलेल्या ऑफरमधील तिकीट भाडे काहीसे असे आहे…

- दिल्ली ते मुंबई (Mumbai) - रु 5,075

- चेन्नई ते दिल्ली - रु 5,895

- बंगलोर ते मुंबई - रु. 2,319

- दिल्ली ते उदयपूर - रु. 3,680

- दिल्ली ते गोवा - रु 5,656

- दिल्ली ते पोर्ट ब्लेअर - रु 8,690

- दिल्ली ते श्रीनगर - रु. 3,730

- अहमदाबाद ते मुंबई - रु. 1,806

- गोवा ते मुंबई - रु. 2,830

- दिमापूर ते गुवाहाटी - रु. 1,783

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com