राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरची चेन्नई ते बंगळुरू विमानसेवा सुरू

राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरची चेन्नई ते बंगळुरू विमानसेवा सुरू

गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांची भागिदारी असलेली अकासा एअरचा (Akasa Air) शुभारंभ झाला. Akasa Air च्या नेटवर्कमध्ये चेन्नई हे पाचवे शहर म्हणून समाविष्ट झालय. अकासा एअरने चेन्नई ते बंगळुरू मार्गावर दररोज दोन उड्डाणे सुरू केली आहेत. 15 सप्टेंबरपासून अकासा एअर चेन्नई-मुंबई (Chennai-Mumbai) मार्गावर दररोज एक फ्लाइट सुरू करणार आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरची चेन्नई ते बंगळुरू विमानसेवा सुरू
IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class

अकासा एअर चेन्नई-बेंगळुरू मार्गावर 26 सप्टेंबरपासून आणखी एक फ्लाइट सुरू करत आहे. देशभरातील अनेक शहरांना आपल्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, अकासा शायरने 26 सप्टेंबरपासून चेन्नई आणि कोची दरम्यान उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अकासा देशभरातील शहरांत नेटवर्क वाढवाण्यासाठी प्रयत्नशील आहे. नवीन शहरे आणि मार्गांसह फ्लाइटची वारंवारता वाढवण्यात अकासा प्रयत्न करत आहे.

अकासा एअरलाइन्सने दोन विमानांनी आपले व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले होते, आतापर्यंत त्यांना 4 विमाने मिळाली आहेत. अकासाने आपला ताफा वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, लहान शहरांना देशातील मोठ्या शहरांशी जोडण्यावर त्याचा भर आहे.

मार्च 2023 पर्यंत अकासा एअरच्या ताफ्यात 18 विमाने असतील. अकासा एअरलाइन पुढील चार वर्षांत आणखी 54 विमाने समाविष्ट करणार आहेत, त्यानंतर अकासाच्या नेटवर्कमधील फ्लाइट्सची संख्या 72 वर पोहोचेल.

राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरची चेन्नई ते बंगळुरू विमानसेवा सुरू
Queen Elizabeth II यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबर्गला रवाना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com