या दोन दिवसात पुर्ण करा बॅंकेची कामे; पुढील 7 दिवस बॅंका राहणार बंद

All public and private sector banks will be closed for seven days
All public and private sector banks will be closed for seven days

नवी दिल्ली: बँकेच्या व्यवाहारासंबंधित काही कामे शिल्लक असतील, तर या दोन दिवसांत पूर्ण करून घ्या. कारण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सर्व बँका 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान म्हणजेच सात दिवस बंद राहणार आहेत. त्यांमुळे बँकेशी संबंधित सर्व कामे करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस मिळणार आहेत. 

सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान सात दिवसासाठी बंद राहणार आहे. 27 मार्च ते 29  मार्च दरम्यान बँकिंग सेवा सलग तीन दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर बँकेच्या सुट्ट्यांच्या तपशीलांचा उल्लेख केला आहे त्यानुसार बँका 29 मार्च रोजी म्हणजेच होळी उत्सवाच्या दिवशी बंद राहील. 30 मार्च रोजी फक्त पाटण्यातील (बिहार) बँका बंद ठेवल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. दरम्यान, बँका केवळ दोन दिवस, म्हणजेच 30 मार्च आणि 3 एप्रिल रोजी सुरू राहतील.

31 मार्च रोजी सर्व बॅंका सुरू असतील पण त्यात खातेधारकांना प्रवेश नसणार आहे. कारण वित्तीय वर्ष बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी समापनाचे कामकाज बॅकमध्ये केले जाणार आहे.बँकने मार्च 2021 साठी सुट्टीची यादी वेबसाइटवर दिली आहे.

मार्च 2021 साठी बँक सुट्टीची यादी

  • 27 मार्च: चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील
  • 28 मार्च: रविवार
  • 29 मार्च:  होळी साजरीमुळे बँका बंद राहतील.
  • 30 मार्च: पाटण्यात होळी उत्सवामुळे बँका बंद राहतील. इतर ठिकाणी बँका खुल्या असतील.
  • 31 मार्च: आर्थिक वर्ष बंद झाल्यामुळे बँका बंद राहतील

या व्यतिरिक्त एप्रिल 2021 मध्ये क्लोजिंग ऑफ अकाउंट्समुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी सुट्टीची जाहीर केली आहे. 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने बँका बंद ठेवल्या जातील आणि 4 एप्रिल ला रविवार असणार आहे. पण या सर्व बँकांच्या सुट्ट्यांमध्ये इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. या सुट्ट्या दरम्यान सर्व बँकेच्या  ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सेवा खुल्या राहणार आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात देशाने 15 ते 16 मार्च दरम्यान दोन दिवसांचा बँक संप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com