अॅमेझॉनकडून पार्टनर सपोर्ट फंड स्थापन

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

फंडामुळे त्‍यांना लॉकडाऊनदरम्‍यान निर्माण होणा-या नवीन स्थितींनुसार त्‍यांचे व्‍यवसाय मॉडेल समायोजित करण्‍यामध्‍ये मदत होईल. एक-वेळ वाटपाच्‍या माध्‍यमातून हा फंड भागीदारांना विविध पद्धतीने साह्य करेल.

मुंबई

सध्‍याच्‍या अनपेक्षित काळामध्‍ये देशव्‍यापी लॉकडाऊनमुळे भारतभरातील लघु व मध्‍यम व्‍यवसायांवर आर्थिकदृष्‍ट्या प्रतिकूल परिणाम झाला आहे. कंपनीवर अधिककरून अवलंबून असलेल्‍या लॉजिस्टिक्‍समधील एसएमबींना सक्षम करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये अॅमेझॉन इंडियाने पार्टनर सपोर्ट फंड सादर केला आहे. लॉजिस्टिक्‍समधील लघु व मध्‍यम व्‍यवसायांसाठी हा पार्टनर सपोर्ट फंड भारतातील डिलिव्‍हरी सेवा
भागीदार (डीएसपी) व निवडक परिवहन भागीदारांसाठी उपलब्‍ध असेल. या फंडामुळे त्‍यांना लॉकडाऊनदरम्‍यान निर्माण होणा-या नवीन स्थितींनुसार त्‍यांचे व्‍यवसाय मॉडेल समायोजित करण्‍यामध्‍ये मदत होईल. एक-वेळ वाटपाच्‍या माध्‍यमातून हा फंड भागीदारांना विविध पद्धतीने साह्य करेल. एप्रि‍ल २०२० महिन्‍यासाठी त्‍यांच्‍या जवळपास ४०,००० कर्मचा-यांना आर्थिक साह्य देण्‍यात येईल. याव्‍यतिरिक्‍त या फंडामुळे काही महत्त्वपूर्ण निश्चित पायाभूत सुविधांचा खर्च कव्‍हर करण्‍यामध्‍ये मदत होईल, तसेच
लॉकडाऊन संपल्‍यानंतर या व्‍यवसायांचे कार्यसंचालन सुरू होताच त्‍यांना रोख व्‍यवहारांमध्‍ये देखील साह्य होईल.
अॅमेझॉनचे कस्‍टमर फुलफिलमेंट कार्यसंचालन, एपीएसी, एमईएनए व लॅटमचे उपाध्‍यक्ष अखिल सक्‍सेना म्‍हणाले, अॅमेझॉन ग्राहकांना त्‍यांच्‍या घरापर्यंत आवश्‍यक वस्‍तूंची डिलिव्‍हरी देत भारताला सुरक्षित ठेवण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आम्‍ही आमच्‍या भागीदारांना व्‍यवसायामधील अनपेक्षित संकटावर मात करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यामध्‍ये गुंतवणूक केली आहे. हा एक-वेळ स्‍पेशल पार्टनर सपोर्ट फंड भागीदारांना त्‍यांच्‍या जवळपास ४०,००० कर्मचा-यांना आर्थिक संकटावर मात करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा फंड पुन्‍हा कार्यसंचालन सुरू झाल्‍यानंतर लॉजिस्टिक्‍समधील आमच्‍या लघु व्‍यवसाय भागीदारांना लवकरात लवकर त्‍यांचे कार्यसंचालन सुरळीत करण्‍यामध्‍ये मदत करेल. आमची भागीदार व भारताप्रती कटिबद्धता दीर्घकालीन आहे. इतर उपायांसह या फंडाचा एसएमबींना सुलभपणे प्रतिकूल स्थितीवर मात करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍याचा मनसुबा आहे. स्‍पेशल अॅमेझॉन पार्टनर सपोर्ट फंड भारतामध्‍ये नुकतेच घोषित करण्‍यात आलेल्‍या जागतिक २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अॅमेझॉन रिलीफ फंडशी (एआरएफ) संलग्‍न आहे. क्‍वारंटाइन करण्‍यात आलेल्‍या किंवा कोविड-१९ पॉझिटिव्‍ह म्‍हणून निदान झालेल्‍या पात्र व्‍यक्‍ती एआरएफचा लाभ घेऊ शकतात. अॅमेझॉन इंडियाने डिलिव्‍हरी सर्विस पार्टनर प्रोग्राम, अॅमेझॉन फ्लेक्‍स प्रोग्राम आणि परिवहन सेवा पुरवणा-या त्‍यांच्‍या ट्रकिंग भागीदारांसाठी अॅमेझॉन रिलीफ फंड सुरू केला आहे. अॅमेझॉन त्‍यांचे सहयोगी, डिलिव्‍हरी सेवा भागीदार, ड्रायव्‍हर्स, कर्मचारी आणि ग्राहकांचे आरोग्‍य व
सुरक्षिततेप्रती कटिबद्ध आहे आणि त्‍यांनी अनेक प्रतिबंधात्‍मक उपायांची अंमलबजावणी केली आहे. अॅमेझॉन इंडियाने त्‍यांच्‍या केंद्रांमध्‍ये कर्मचा-यांच्‍या शरीराचे तापमान तपासण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यांनी सर्व साइट्सच्‍या स्‍वच्‍छतेचे प्रमाण व कार्य वाढवले आहे. अॅमेझॉन इंडियाने पद्धतींमध्‍ये देखील समायोजन केले आहे, ज्‍यामुळे टीम्‍स साइटवर असताना किंवा ग्राहकांना डिलिव्‍हरी देताना सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करतील. साइट्सवर कामावर येताना, तसेच बाहेर डिलिव्‍हरीज देण्‍यासाठी जाताना सर्व सहयोगींना त्‍यांच्‍या नाका-तोंडावर पुनर्वापर होणारे फेसमास्‍क परिधान करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे.

संबंधित बातम्या