आज अ‍ॅमेझॉन इंडियाची सर्व कार्यालये अंधारात; यासाठी घेतला कंपनीने निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

अ‍ॅमेझॉन इंडियाने यावर्षीच्या अर्थ आवर दरम्यान देशातील आपल्या सर्व ऑपरेशन साइट्स आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये वीज 'स्विच ऑफ' करण्याची प्रतिकात्मक घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉन इंडियाने यावर्षीच्या अर्थ आवर दरम्यान देशातील आपल्या सर्व ऑपरेशन साइट्स आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये वीज 'स्विच ऑफ' करण्याची प्रतिकात्मक घोषणा केली आहे. कंपनी सामूहिक कृतीतून ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व जागरूकता पसरविण्यासाठी जागतिक चळवळीत सामील होणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अ‍ॅमेझॉन इंडिया 27 मार्च 2021 रोजी म्हणजेच आच अर्थ ऑवर दरम्यान 8.30 ते 9.30 दरम्यान त्याच्या इमारतींमध्ये 222 तासांपेक्षा जास्त काळ 'लाईट ऑफ' चळवळीत सहभागी होणार आहे. 

या जागतिक चळवळीत अ‍ॅमेझॉन इंडियाची संपूर्ण पायाभूत सुविधा सहभागी होणार आहे, ज्यात  15 राज्यांमधील 60 पेक्षा अधिक फुलफिलमेंट सेंटर,19 राज्यांतील क्रमवारी केंद्रे आणि 1750 अ‍ॅमेझॉनच्या मालकीच्या आणि भागीदारीत असेलेले वितरण केंद्रे तसेच कॉर्पोरेट कार्यालये यांचा समावेश असणार आहे.

1500 वितरण केंद्रांवर परिणाम होणार 

ही प्रतिबद्धता अ‍ॅमेझॉनच्या स्वतःच्या इमारतींबरोबरच तिरुअनंतपुरम, लेह आणि चंपाई यासारख्या 750 हून अधिक शहरांमध्ये आणि जवळजवळ 1500 डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर स्थानकांव्यतिरिक्तदेखील अर्थ आवर दरम्यान काही मिनिटांसाठी त्यांच्या सर्व स्थानकांची वीज बंद ठेवली जाणार. हा कार्यक्रम पृथ्वीवरील ज्वलंत प्रश्नांविषयी जागरूकता वाढविण्याकरिता जगातील कोट्यावधी लोकांसह अ‍ॅमेझॉन इंडियाचे कर्मचारी, सहयोगी, भागीदार आणि त्याच्या इकोकेमिस्टना जोडणार आहे.

 

संबंधित बातम्या