अ‍ॅलेक्सा, आजीच्या आवाजात बोल ना, अ‍ॅमेझॉनचं नव फिचर प्रियजनांच्या आठवणी करणार जाग्या

अलेक्सा लवकरच तुमच्या आयुष्यात नसलेल्या व्यक्तीच्याही आवाजात बोलण्यास सुरुवात करेल
अ‍ॅलेक्सा, आजीच्या आवाजात बोल ना, अ‍ॅमेझॉनचं नव फिचर प्रियजनांच्या आठवणी करणार जाग्या
AlexaDainik Gomantak

वॉशिंग्टन: अ‍ॅमेझॉनचा डिजिटल व्हॉईस असिस्टंट अलेक्सा सामान्यतः होम गॅजेट्स नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. मात्र अ‍ॅमेझॉन आता एक वेगळाच मार्ग आणण्याची योजना आखत आहे ज्यामुळे अलेक्सा व्हॉइस असिस्टंट वापरकर्त्यांना त्यांच्या कुटुंबातील निधन झालेल्या सदस्यांशी बोलण्यास मदत करणार आहे. (Amazon Alexa)

मार्स कॉन्फरन्समध्ये एका मिनिटापेक्षा कमी ऑडिओ ऐकल्यानंतर अ‍ॅलेक्साला कोणत्याही आवाजाची नक्कल करू देणारी प्रणाली विकसित करण्याबाबतची आपली योजना जाहीर केली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार अ‍ॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहन प्रसाद यांनी लास वेगासमधील कंपनीच्या परिषदेत ही घोषणा केली.

 Alexa
Amazon चे CEO पद सोडल्यानंतर जेफ बेझोस करणार काय?

या नवीन फीचरचे ध्येय "आठवणी कायम ठेवणे" हे आहे. ज्यांनी साथीच्या आजाराच्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्यांच्यासाठी हे एक सुखदायक साधन असू शकते असा कंपनीचा विश्वास असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. जरी प्रसाद यांनी या नवीन फिचर्सच्या लॉन्चसाठी टाइमलाइनचा उल्लेख केला नसला तरी आवाजाची नक्कल करण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी ऑडिओ लागेल असे त्यांनी नमूद केले आहे.

अ‍ॅमेझॉनने बुधवारी लास वेगास येथे झालेल्या एका परिषदेदरम्यान अलेक्सासोबतच्या सहवासासाठी आपली दृष्टी शेअर केली. आगामी फिचर्ससह, वापरकर्ते अलेक्साला त्यांना हवा असलेला आवाज ऐकू शकतील. मग ते त्यांचे आवडते पात्र असोत किंवा सेलिब्रिटी असोत, किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीतीही व्यक्ती, आपली आजी, आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकता येणार आहे. कंपनीने कॉन्फरन्स दरम्यान एक डेमो व्हिडिओ दाखवला, जिथे अलेक्साला विचारले गेले, "अलेक्सा, आजी मला विझार्ड ऑफ ओझ वाचून पूर्ण करू शकेल का?", ज्याला आभासी सहाय्यकाने त्या व्यक्तीच्या आजीसारख्या आवाजात प्रतिसाद दिला.

 Alexa
समजून घ्या काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण! | What is National Herald Case? | Gomantak Tv

Amazon ने Proteus नावाचा पहिला पूर्ण स्वायत्त रोबोट जाहीर केल्यानंतर लगेचच हे नविन फिचर्स आणले आहे. अ‍ॅमेझॉनचा दावा आहे की प्रोटीअस कोणत्याही मॅन्युअल सहाय्याशिवाय स्वतःच ऑपरेट करू शकतो, याचा अर्थ रोबोट त्याच्या वेअरहाऊसच्या विशिष्ट भागात मर्यादित नसून आसपासच्या कर्मचार्‍यांसह आपोआप त्याचे कार्य करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com