Ashwini Vaishnaw यांनी नवीन वर्षात केली मोठी घोषणा, 'या' लोकांना मिळणार 5 हजार रुपये

Small Loan: लोकांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदेही देत ​​आहे.
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw Dainik Gomantak

Ashwini Vaishnaw: लोकांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदेही देत ​​आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी या लोकांना 5000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सांगितले आहे.

दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 2023 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यावरील विक्रेत्यांना 5,000 रुपयांपर्यंतच्या सूक्ष्म कर्जाची (Loan) सुविधा देण्यावर सरकार विशेष भर देणार आहे.

Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw यांचा मोठा निर्णय, 'या' टेलिकॉम कंपनीला मोदी सरकारचा आधार!

त्यांना मदत मिळेल

डिजिटल इंडिया पुरस्कार वितरण समारंभात वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी प्रत्येक नागरिकाला डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी देशातील सर्व भागात 4G आणि 5G दूरसंचार सेवा देण्यासाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

5G तंत्रज्ञान

ते पुढे म्हणाले की, देशात यावर्षी स्वदेशी विकसित 4G आणि 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होताना दिसेल. दुसरीकडे, अश्विनी वैष्णव असेही म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार, देशात लवकरच इलेक्ट्रॉनिक चिप निर्मिती प्रकल्प स्थापन केला जाईल.

Ashwini Vaishnaw
Jan Dhan Yojana: जन धन योजनेतर्गंत तुमच्या खात्यात येणार 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

नुकसान भरपाई

प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड (SVANidhi) योजना जून 2020 मध्ये सूक्ष्म-कर्ज सुविधा म्हणून सुरु करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com