ऑडी क्यू २’ आता गोव्यातही

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

लक्झरी ऑल राऊंडर म्हणून गणल्या जाणाऱ्या ऑडी क्यू २ ची विक्री गोव्यात सुरू झाली आहे. ऑडी गोवा येथे या नव्या गाड्या उपलब्ध आहेत. १६ रोजीपासून भारतात स्पोर्टी ऑल राऊंडर ऑडी क्यू २ च्या विक्रीला प्रारंभ झाला.

पणजी: लक्झरी ऑल राऊंडर म्हणून गणल्या जाणाऱ्या ऑडी क्यू २ ची विक्री गोव्यात सुरू झाली आहे. ऑडी गोवा येथे या नव्या गाड्या उपलब्ध आहेत. १६ रोजीपासून भारतात स्पोर्टी ऑल राऊंडर ऑडी क्यू २ च्या विक्रीला प्रारंभ झाला. ३४  ते ४८ लाख रुपये या रेंजमध्ये या कार उपलब्ध आहेत.

या मध्ये पाच वर्ष स्विर्हस पॅकेज व २+३ विस्तारित वॉरंटी आणि २+३ वर्षे रोड साईड मदत अशा सुविधा समाविष्ट आहेत. याबाबत माहिती देताना ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर धिल्लन यांनी सांगितले की, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी बाजारात आणली आहे. मनमोहक डिझाईन, पॉश इंटिरियर व अनेक वैशिष्ट्यांमुळे ऑडी क्यू २ चे अनेक ग्राहकांनी कौतुकच केले आहे. १९०एचपी, २.० टीएफएसआय इंजिन, प्रोग्रेसिव्‍ह स्टीअरींग व क्वात्रो यामुळे या कारमधून जाताना एक वेगळा अनुभव मिळतो.

४०५ लिटर्स ते १०५० पर्यंत विस्तारणारी लगेज रुम असल्याने प्रत्येक गरज या कारमध्ये परिपूर्ण केली जात आहे. एमएमआय डिस्प्ले, ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट, ऑडी फन बॉक्स तसेच सेव्हन स्पीड एस ट्रॉनीक ड्युएल क्लच, फोअर लिंक सस्पेनशन व प्रोग्रेसिव्ह स्टीअरिंग अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय अनेक नवनवीन व वैशिष्टपूर्ण वैशिष्टे ऑडी क्यू २ मध्ये आहेत. आलिशान कारची आवड असलेल्या ग्राहकांना नवीन ऑडी क्यू २ नक्कीच आवडेल.

 

 

संबंधित बातम्या