Ayushman Bharat Golden Card: ओमिक्रॉनवर होईल मोफत उपचार, वाचा सविस्तर

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात.
Ayushman Bharat Golden Card: ओमिक्रॉनवर होईल मोफत उपचार, वाचा सविस्तर
Ayushman Bharat Golden CardDainik Gomantak

देशात आरोग्य संबंधित सुविधा आणि मोफत व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डच्या (Card) माध्यमातून प्रत्येक कार्डधारकाला 5 लाख रुपयापर्यंत (Money) मोफत आरोग्य मिळणार आहे. या कार्डच्या मदतीने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्डद्वारे अनेक आजारांवर मोफत उपचार करण्याची तरतूद आहे. गेल्या काही दिवसापासून भारतात ओमिक्रॉन (Omicron) विषाणुचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो की ओमिक्रॉन विषणूची लागण झाल्यास तुमच्या कुटुंबाला मोफत उपचार मिळेल का? चला तर मग जाणून घेवूया

आयुष्यमान योजनेअंतर्गत देशातील गरीब ,वंचित लोकांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार. याद्वारे देशातील सुमारे 10 कोटी कुटुंबांना त्याचा लाभ मिळत आहे. या कार्डचा वापर करून ओमिक्रॉनवर मोफत उपचार केले जातील. या कार्डचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे (Rules) पालन करावे लागेल.

* जर एखादी व्यक्ति ग्रामीण भागात राहत असेल तरच त्याला या कार्डचा लाभ घेता येईल.

* याशिवाय घरात 16 -59 वर्षे वयाची कोणतीही व्यक्ति नसावी

* घराचा प्रमुख महिला असावी किंवा घरात कोणीतरी अपंग असावे किंवा कुटुंब अनुसूचित जाती/जमातीचे असावे

* बेघर किंवा आदिवासी व्यक्ति या कार्डचा लाभ घेवू शकतात

Ayushman Bharat Golden Card
व्हॉट्सअ‍ॅप 'या' उत्तम फीचरवर करतंय काम

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बनवण्याची प्रक्रिया

* सर्वात प्रथम लोकसेवा केंद्रात जावे.

* त्यानंतर तुमचे नाव केंद्राच्या अधिकाऱ्याकडून तपासले जाईल.

* जर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळेल.

* यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल नंबर, रेशन कार्ड फोटो कॉपी, पास पोर्ट साईज फोटो या सर्व गोष्टी सबमीट कराव्या.

* यानंतर तुमचे नाव नोदवल्या जाईल.

* यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड (Password)देखील दिले जाईल.

* 15 दिवसानंतर तुम्हाला तुमचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com