मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाने बाबा रामदेव यांची कंपनी क्षणात मालामाल

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या रुची सोयाच्या (Ruchi Soya) शेअर्समध्ये (Shares) मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे .
मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाने बाबा रामदेव यांची कंपनी क्षणात मालामाल
Baba Ramdev's company Ruchi Soya companies shares on high todayDainik Gomantak

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या रुची सोयाच्या (Ruchi Soya) शेअर्समध्ये (Shares) मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे . सोमवारी मार्केटमध्ये पतंजलीने (Patanjali) विकत घेतलेल्या रुची सोयाचा साठा BSEवर 3 टक्क्यांहून अधिक वाढलेला दिसला . बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाम तेलावरील (Palm Oil) आयात शुल्क कमी झाल्यानंतर झाली आहे आहे. रुची सोयाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना देखील याचा खूप फायदा झाला आहे.त्याचबरोबर कंपनीच्या संपत्तीत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.(Baba Ramdev's company Ruchi Soya companies shares on high today)

खाद्यतेलांच्या चढ्या किमतींमुळे सरकारने पुन्हा एकदा किंमती कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयात शुल्क कमी केले आहे. सीपीओ, पामोलिन, सूर्यफूल, सोयाबीन डिगम आणि सोयाबीन परिष्कृत खाद्यतेलांवरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पूर्वी सुद्धा आयात शुल्क कमी केले होते पण तरीही वाढत्या किंमती नियंत्रणात आल्या नाहीत. आयात शुल्कातील ही कपात केवळ सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे.

Baba Ramdev's company Ruchi Soya companies shares on high today
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय:अर्थमंत्री

रुची सोयाचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले

रुची सोया भारतातील खाद्यतेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. पाम तेलावरील आयात शुल्क कमी झाल्यामुळे रुची सोयाचा शेअर सोमवारी 3.58 टक्क्यांनी वाढून 1081.90 रुपयांवर पोहोचला आहे.

शेअर बाजारातील घसरणीच्या दरम्यान गुंतवणूकदारांनी रुची सोयामध्ये मोठा नफा कमावला आहे. रुची सोयाच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर 1044.50 रुपयांवर बंद झाला होता . या किंमतीवर कंपनीचे मार्केट कॅप 30,900.59 कोटी रुपये होते. आज कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1,106.41 कोटी रुपयांची वाढ होऊन ती 32,007 कोटी रुपये इतके झाली आहे .

पाम तेल व्यवसायावर बाबांचे लक्ष वाढले

पाम तेलावर स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यात राष्ट्रीय खाद्यतेल-पाम तेल मिशन (NMEO-OP) मंजूर केले. या मोहिमेला मंजुरी मिळाल्यानंतर बाबा रामदेव यांनी आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेलाची लागवड सुरू करण्याची योजना आखली आहे.

Baba Ramdev's company Ruchi Soya companies shares on high today
Swiss Bank सरकारला देणार भारतीय खातेधारकांची यादी

रुची सोया 4300 कोटींचा एफपीओ आणणार

सेबीने रुची सोयाचा एफपीओ मंजूर केला आहे. FPO च्या माध्यमातून 4,300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये दिवाळखोर कंपनी रुची सोया 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. अदानी ग्रुप देखील ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत सहभागी होता पण नंतर मागे हटण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com