आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बदलता येणार बँक ब्रांच; अशी आहे प्रक्रिया

State Bank of India
State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. जर एखाद्या ग्राहकाला आपले खाते असलेल्या बँकची ब्रांच (Bank Branch) बदलायची असेल तर आता त्याच्यासाठी  बँकेमध्ये जाण्याची गरज नाही. आता कोणतीही व्यक्ति घरबसल्या आपली बँकेची ब्रांच बदलू शकणार आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्टेट बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेने संपूर्ण प्रकिया ऑनलाइन (Online) केली आहे. तुम्हाला जर तुमची ब्रांच बदलायची असेल तर पुढील प्रक्रिया (process) पूर्ण करावी  लागेल. (Bank branches can be changed online read  the process)

कशी आहे प्रक्रिया -
- स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर onlinesbi.com लॉगइन करावे. 
- त्यानंतर पर्सनल बॅकिंग ऑप्शनला  सिलेक्ट करून यूजरनेम आणि पासवर्ड टाकावे. 
- यानंतर ई सर्विस टॅबवर क्लिक करून ट्रान्सफर सेविग अकाऊंटवर जाऊन क्लिक करा. 
- यानंतर तुम्हाला तुमचा जो अकाऊंट  ट्रान्सफर करायचं आहे त्यावर जाऊन क्लिक करा. 
- त्यानंतर तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये तुमचा अकाऊंट  ट्रान्सफर करायचा आहे त्या बँकेचा आयएफएससी  (IFSC) कोड त्या ठिकाणी टाकावा लागतो. 
- तुम्ही टाकलेल्या डिटेल्स तपासुन घेतल्यावर, तुमच्या मोबाइलवर ओटीपी येतो. तो ओटीपी टाकून पुन्हा तपासून घ्या. 
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक तुमच्या नोंद असलेल्या नंबरवर तुमच्या खात्याच्या ट्रान्सफरची पूर्ण माहिती देते. 

RBI ची मोठी घोषणा; कोरोनाविरोधी लढ्याला मिळणार बळ
 
तसेच  ऑनलाइनशियाव ग्राहकांना योनो लाइटच्या  (yono lite) माध्यमातून  देखील आपल्या खात्याची ब्रांच बदलता येणार आहे. परंतु या प्रक्रियेसाठी ग्राहकांचा मोबाइल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.        


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com