Bank Holiday 2022: वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 16 दिवस बॅंका बंद

जानेवारीमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. म्हणूनच बॅंकच्या सुट्टीची संपूर्ण यादी पाहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
Bank Holiday 2022: वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 16 दिवस बॅंका बंद

Bank Holiday 2022

Dainik Gomantak

नवीन वर्ष 2022 (New Year) आजपासून सुरू झाले आहे. नवीन वर्षात लोकांच्या मनात नवीन योजना आणि नवीन आशा आहेत नवे स्वप्न नवे निर्धार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला बँकेशी संबंधित काहीतरी कामकाज करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जानेवारीमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. म्हणूनच बॅंकच्या सुट्टीची संपूर्ण यादी पाहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका बंद असणार आहे. विविध सुट्ट्यांमुळे या महिन्यात बँकांमध्ये 16 दिवस कोणतेही कामकाज होणार नाही. म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्लेच होणार आहे. देशभरात वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुटी असते हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका 16 दिवसात बंद राहणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Bank Holiday 2022</p></div>
कपडे आणि फुटवेअरचे दर वाढवण्यासंदर्भात GST परिषदेचा मोठा निर्णय

प्रत्येक राज्यांमध्ये सुट्या वेगवेगळ्या असतात

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने जानेवारीत महिन्यातील सणांचा आढावा घेवून अनेक दिवस बँका बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र ऑनलाइन बँकिंग सेवा ग्राहकांसाठी चोविस तास सुरू राहणार आहे. राज्यांमध्ये सणांनिमित्त विविध दिवस सुटी असणार आहेत. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. म्हणून बँकिंगच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांतील सणांवरही अवलंबून असतात.

<div class="paragraphs"><p>Bank Holiday 2022</p></div>
चारचाकीवर ब्रीफकेस, ब्रीफकेसवर अभ्यास आनंद महिंद्रा यांचा वर्षातील आवडता फोटो

जानेवारी 2022 बँक सुट्ट्यांची यादी

1 जानेवारी - शनिवार (नवीन वर्षाचा दिवस)

2 जानेवारी - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

4 जानेवारी - मंगळवार (लोसुंग - सिक्कीम)

8 जानेवारी - शनिवार ( दुसरा शनिवार)

9 जानेवारी - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

11 जानेवारी -मंगळवार (मिशनरी डे - मिझोरम)

12 जानेवारी - बुधवार (स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस)

14 जानेवारी - शुक्रवार (मकर संक्रांती / पोंगल)

15 जानेवारी - शनिवार (उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांती उत्सव / माघे संक्रांती / संक्रांती / पोंगल / तिरुवल्लुवर दिवस)

16 जानेवारी ) – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 जानेवारी - मंगळवार (थाई पूसम-चेन्नई)

22 जानेवारी - शनिवार (चौथा शनिवार)

23 जानेवारी - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

26 जानेवारी - बुधवार (प्रजासत्ताक दिन)

30 जानेवारी - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

31 जानेवारी - सोमवार (मी-डॅम-मी-फी, आसाम)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com