Bank Holiday in March: 'या' महिन्यात 12 दिवस बॅंक राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

आजच बॅंक संबंधित सर्व काम पुर्ण करा
Bank Holiday in March
Bank Holiday in MarchDainik Gomantak

Bank Holiday in March:  मार्च महिन्यात होळीसह अनेक सण साजरे होणार आहेय यामुळे बँकांना अनेक दिवस बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या महिन्यासाठी बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे.

त्यानुसार बँका एकूण 12 दिवस बंद असणार आहे. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. 

या महिन्यात आठवडाभरानंतर होळी हा रंगांचा सण असून त्याची तयारीही सुरू झाली आहे. याशिवाय गुढीपाडवा/पहिली नवरात्री/तेलुगु नववर्ष आणि रामनवमी हे देखील मार्चमध्येच येतात.

हे सण वेगवेगळ्या राज्यांच्या आधारावर आहेत. त्यानुसार रिझर्व्ह बँकने सुट्ट्यांची यादी जाहीर करते. विविध सण आणि कार्यक्रम पाहता बँक हॉलिडे वेगळी असू शकते.

या सणांव्यतिरिक्त, मार्चमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार अशा सहा साप्ताहिक सुट्ट्या आहेत. मार्च महिन्यातील पहिली बँक सुट्टी 3 मार्च रोजी आहे, तर शेवटची सुट्टी 30 मार्च रोजी असेल.

Bank Holiday in March
LPG Price Hike: झळा महागाईच्या! कमर्शियल अन् घरगुती सिलेंडर झाले महाग
  • या तारखांना बँक बंद

3 मार्च छपचार कूट

5 मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)

7 मार्च होळी / होळी दहन /

8 मार्च धुलेती / डोल जत्रा / होळी / यासंग (दुसरा दिवस)

9 मार्च होळी (पाटणा)

11 मार्च दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

12 मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)

22 मार्च गुढी पाडवा / उगादी / बिहार दिवस / 1 ला नवरात्री / तेलुगु नवीन वर्ष

25 मार्च चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

26 मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • बँकिंगचे काम ऑनलाइन पूर्ण करता येणार

बँकेच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. म्हणजेच बॅंकेच्या सुट्ट्या राज्य आणि शहरांमध्ये भिन्न आहेत. परंतु बँकांच्या शाखा बंद असूनही, तुम्ही बँकिंगशी संबंधित काम घर बसल्या ऑनलाइन करू शकता. ही सुविधा 24 तास कार्यरत राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com