Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद, महत्त्वाच्या कामांचे करा नियोजन

Bank Holidays List: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Bank Holidays
Bank Holidays Dainik Gomantak

Bank Holidays in December 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसोबतच ख्रिसमस इत्यादी सर्व प्रसंगी बँका बंद राहतील. डिसेंबरमध्ये तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर त्यासाठी आधीच नियोजन करा. डिसेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँकांना सुट्ट्या असतील.

डिसेंबरमध्ये पहिली सुट्टी 3 डिसेंबरला

13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक महिन्याप्रमाणे शनिवार आणि रविवारचा समावेश होतो. आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका (Bank) बंद राहतील. तथापि, या सुट्ट्या कधीकधी प्रदेशानुसार असतात. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवते. डिसेंबरमधील पहिली सुट्टी 3 डिसेंबर रोजी असेल.

Bank Holidays
Bank Holidays November 2022: नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बॅंका, सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

19 तारखेला गोवा मुक्ती दिनाची सुट्टी

3 डिसेंबरनंतर 4 डिसेंबरला रविवारची सुट्टी आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक दोन दिवस बंद राहणार आहेत. यानंतर 12 डिसेंबरलाही देशातील काही भागात बँका बंद राहतील. 18 डिसेंबर रविवार आणि 19 हा गोवा (Goa) मुक्ती दिन आहे. 24, 25 आणि 26 डिसेंबर ही ख्रिसमससाठी प्रदेश-विशिष्ट सुट्टी आहे.

Bank Holidays
Bank Holidays in October: ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद

यानंतर 29, 30 आणि 31 डिसेंबरला सलग तीन दिवस बँका बंद राहतील. 29 तारखेला गुरु गोविंद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त, 30 तारखेला यू कियांग नांगबा आणि 31 तारखेला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com