Bank Strike 2023: देशभरात बँकांचा संप, करोडो बँक ग्राहकांना एटीएममधून काढता येणार नाहीत पैसे!

Bank Strike Latest News: 28 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बँकेच्या सेवा विस्कळीत राहू शकतात. बँक युनियनने 2 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Bank ATM
Bank ATMDainik Gomantak

Bank Strike 2023: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अडचणी येऊ शकतात. 28 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बँकेच्या सेवा विस्कळीत राहू शकतात. बँक युनियनने 2 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या संपामुळे एटीएममधून पैसे काढण्यापासून अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

चार दिवस बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत

बँक युनियनने 30 आणि 31 जानेवारीला बँक (Bank) संपाची घोषणा केली आहे. यासोबतच 28 जानेवारी हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. दुसरीकडे, 29 जानेवारीला रविवार असल्यामुळे बँका बंद असतील, त्यामुळे तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम शुक्रवारी पूर्ण करु शकता नाहीतर 1 फेब्रुवारीला तुमचे काम पूर्ण करु शकता.

Bank ATM
Bank Strike: पुढील आठवड्यात देशभरात बँकांचा संप, एटीएमसह इतर सेवांवर होणार परिणाम

संप का होत आहे?

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ची बैठक मुंबईत पार पडली, ज्यामध्ये बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर (Government) दबाव आणण्यासाठी बँक संघटना संपावर जात आहेत.

बँकेचे काम 15 दिवसांत झाले पाहिजे

माहिती देताना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, युनायटेड फोरमची बैठक झाली असून, त्यात 2 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, बँक युनियनची मागणी आहे की, बँकिंगचे काम 5 दिवस झाले पाहिजे. यासोबतच पेन्शनही अपडेट करावी.

Bank ATM
SBI-PNB-BoB सह सरकारी बँकांबाबत मोठी घोषणा, तुमचेही खाते असेल तर...

पगार वाढवण्याची मागणी

यासोबतच एनपीएस रद्द करून पगारवाढीसाठी चर्चा करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com