SBI, HDFC अन् ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Banking System: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेसाठी काही विशेष सूचना केल्या आहेत.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

Banking System: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी. तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेसाठी काही विशेष सूचना केल्या आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या गरजेनुसार बँकिंग व्यवस्था अधिक सोपी करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी बँकेला दिले. जेणेकरुन ग्राहक शक्य तितक्या बँकेशी जोडू शकतील.

दरम्यान, बँकांनी (Bank) ग्राहकांच्या सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरुन कर्जदारांसाठी त्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

Nirmala Sitharaman
HDFC ने केला मोठा बदल, करोडो ग्राहकांना मिळणार दुहेरी लाभ

अर्थमंत्र्यांनी दिली मोठी सूचना

उद्योग प्रतिनिधी आणि अर्थमंत्री यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अर्थमंत्र्यांनी या विशेष सूचना केल्या आहेत. हा सल्ला पाळावा, असे अर्थमंत्र्यांनी बँकांना सांगितले. याचा फायदा SBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांच्या ग्राहकांना होणार आहे. यावर एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, 'स्टार्टअपची चिंता अधिक इक्विटीची आहे. या बैठकीत बँकेच्या अध्यक्षांनी आपली बाजू मांडली.'

ग्राहकांच्या सुविधेवर भर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, 'बँकांनी अधिकाधिक ग्राहक अनुकूल बनण्याची गरज आहे. परंतु प्रतिकूल जोखीम घेण्याइतपत ते नसावे. परंतु तुम्ही ग्राहकांची सोय लक्षात घेऊन अधिकाधिक मैत्रीपूर्ण वागणे आवश्यक आहे.'

Nirmala Sitharaman
HDFC FD Scheme : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! या विशेष FD योजनेची अंतिम मुदत वाढवली

यावर दिनेश खारा म्हणाले की, 'ग्राहकांच्या (Customers) सोयीसाठी बँकेत डिजिटलायझेशनची प्रक्रिया वाढत आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग संबंधित समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. यानंतर बँकांनी अनेक प्रकारच्या सुविधांचा समावेश केला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com