मार्च महिन्यात या तारखांना बंद राहणार महाराष्ट्रातील बॅंका

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात बँकांशी संबंधित कामांमध्ये साधारणत: थोडी वाढ होते. यावर्षी मार्च महिन्यात बॅंकांना 11 दिवस सुट्टी आहे.

नवी दिल्ली : मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात बँकांशी संबंधित कामांमध्ये साधारणत: थोडी वाढ होते. यावर्षी मार्च महिन्यात बॅंकांना 11 दिवस सुट्टी आहे. ही 11 दिवस सुट्टी देशभरातील बॅेकांना लागू असून, यामध्ये त्या त्या राज्यातील विशेष दिवसांचा समावेश आ्हे. इतर राज्यांमधील बॅंकांना ती सुट्टी लागू होणार नाही. महाराष्ट्रातील बॅंकांना या महिन्यात 8 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे, जर तुमचं बॅंकेचं कोणतं महत्त्वाचं काम राहिलं असेल, तर लवकर उरकून घ्या. 

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मार्चमध्ये काही अतिरिक्त सुट्ट्या आणि काही प्रादेशिक उत्सवांसह देशात कार्यरत बँका रविवारी व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. दरम्यान, बॅंक शाखा जरी या सुट्ट्यांमुळे बंद असल्या, तरी ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन मात्र सुरू राहणार आहे. म्हणजेच, तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करू शकता. यासाठी तुम्ही RTGS, NEFT या मार्गांचा अवलंब करू शकता. या महिन्यात बँका कोणत्या तारखांना बंद असणार आहेत ते जाणून घेऊया : 

रामदेव बाबांवर सर्जिकल स्ट्राईक; कोरोनिलबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

 - 7  मार्च : रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

- 11 मार्च : महाशिवरात्रीमुळे देशातील बर्‍याच राज्यांत बँकांमध्ये कामकाज      बंद राहणार आहे.

- 13 मार्च : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बॅंकांना सुट्टी असेल.

- 14 मार्च : रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

- 21 मार्च : रविवार असल्याने बँकांना आठवड्यातून सुट्टी असेल.

- 27 मार्च : चौथ्या शनिवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील.

- 28 मार्च : रविवार असल्याने बँका बंद राहतील.

- 29 मार्च : धूलिवंदनामुळे बॅंका बंद राहतील. 

संबंधित बातम्या